78th independence day : पंतप्रधान मोदी यांनी केलं लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात

132
78th independence day : पंतप्रधान मोदी यांनी केलं लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
78th independence day : पंतप्रधान मोदी यांनी केलं लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सलग ११ व्या वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण (78th independence day) केलं आहे. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लाल किल्ल्याच्या परिसरात जमलेल्या जनतेवर वायूसेनेच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

(हेही वाचा –Independence Day 2024 : पायाभूत सुविधा क्षेत्रात भारताची कामगिरी नेत्रदीपक; तरीही करण्यासारखे पुष्कळ काही…)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “या वर्षी आणि गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे चिंता वाढत आहे. नैसर्गिक आपत्तींमध्ये अनेकांनी आपले कुटुंब आणि मालमत्ता गमावली आहे. मी आज त्या सर्वांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. या संकटाच्या काळात देश त्यांच्यासोबत उभा आहे. आपला देश शेकडो वर्षांपासून गुलाम होता. हा काळ संघर्षाचा होता. शेतकरी, महिला, वृद्ध स्वातंत्र्याचा लढा लढत राहिले. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रमाच्या आधीही आदिवासी क्षेत्रात स्वातंत्र्याचा लढा लढण्यात आला.” (78th independence day)

(हेही वाचा –78th Independence Day : अवकाश संशोधनात भारताची उत्तुंग भरारी !)

“तेव्हाच्या लोकसंख्येनुसार देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी 40 कोटी लोकांनी स्वातंत्र्याचा लढा लढला. त्यांनी सामर्थ्य दाखवलं. त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं. लढत राहिले. त्यांच्या मुखी वंदे मातरम् हा एकच स्वर होता. आम्हाला गर्व आहे की, आमच्यात त्यांचेच रक्त आहे. फक्त 40 कोटी लोकांनी जगातील महासत्तेला उलथून लावले होते. आजचा हा शुभ मुहूर्त आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरण पावलेल्या आणि आपले जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यप्रेमींना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा सण आहे. हा देश, आम्ही त्यांचे ऋणी आहोत.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. (78th independence day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.