Vidhan Sabha Election 2024 : महायुतीकडून लोकसभेप्रमाणे विधानसभेचाही सर्व्हे; शिवसेना ठरणार मोठा भाऊ, १७७ जागांवर अनुकूल

214
Vidhan Sabha Election 2024 : महायुतीकडून लोकसभेप्रमाणे विधानसभेचाही सर्व्हे; शिवसेना ठरणार मोठा भाऊ, १७७ जागांवर अनुकूल
Vidhan Sabha Election 2024 : महायुतीकडून लोकसभेप्रमाणे विधानसभेचाही सर्व्हे; शिवसेना ठरणार मोठा भाऊ, १७७ जागांवर अनुकूल
  • मुंबई प्रतिनिधी
लाेकसभा निवडणुकीप्रमाणे महायुतीकडून (mahayuti) विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) मतदार संघनिहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार शिवसेनेने केलेल्या सर्वेक्षणात १७७ जागा पक्षाला अनुकूल असल्याचे म्हटले आहे. तर भाजपाने (BJP) ५० ते ५५ जागा पक्षाला मिळतील, असा दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत शिवसेनाच (Shiv Sena) मोठा भाऊ ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  

(हेही वाचा- 78th independence day : पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा)

लोकसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) भाजपाने सर्वेक्षणाचा दाखला देत, महायुतीत शिवसेनेला केवळ १५ तर राष्ट्रवादीला ५ जागा सोडल्या. भाजपने २८ जागा लढवून ९ खासदार निवडून आणल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात ८ जागा जिंकून आणल्या. शिवसेनेचा (Shiv Sena) आत्मविश्वास यामुळे दुणावला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा लढविण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेने नवीन सर्व्हे केला असून यात १७७ जागा अनुकूल असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील अडीच वर्षात चांगले काम केले आहे. अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत. महिला, कष्टकरी वर्गासह शेतकऱ्यांपासून तरूण वर्गापर्यंत दिलादायक निर्णय घेतले आहेत. आता ही महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबविण्यात येत आहे. राज्यभरातून योजनेला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. तीर्थ दर्शन योजना, वयोश्री, कौशल्य विकास आदी सर्व योजना मुख्यमंत्र्यांच्या पथ्यावर पडतील, अशी शक्यता सर्वेतून वर्तविण्यात आली आहे.

(हेही वाचा- 78th independence day : सरकारला पत्र लिहून तुमच्या अडचणी सांगा, पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन)

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाचा भाजपाने नुकताच सर्व्हे केला आहे. त्यानुसार भाजपाला ५० ते ५५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. तरीही सर्वाधिक १५० जागा लढवण्यावर भाजपा ठाम आहे. तर उर्वरित जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडण्यात येणार आहेत. मात्र, लोकसभेला सर्व्हे करून भाजपाने महायुतीतील घटक पक्षांची वाताहात केली होती. पुन्हा तशीच स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नवीन सर्वे करून महायुतीत सर्वाधिक जागा पक्षालामिळाव्यात, असा प्रस्ताव महायुतीसमोर मांडण्यात आल्याचे समजते. (Vidhan Sabha Election 2024)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.