Suzlon Energy : सुझलॉन कंपनीचं काय आहे भविष्य? शेअर्स विकत घेतल्याने फायदा होईल की तोटा?

269
Suzlon Energy : सुझलॉन कंपनीचं काय आहे भविष्य? शेअर्स विकत घेतल्याने फायदा होईल की तोटा?
Suzlon Energy : सुझलॉन कंपनीचं काय आहे भविष्य? शेअर्स विकत घेतल्याने फायदा होईल की तोटा?
◆सुझलॉन एनर्जीमध्ये गुंतवणूक का आणि कशी करावी?
सुझलॉन एनर्जीचे (Suzlon Energy) भविष्य चांगलं दिसत आहे. कारण दिवसेंदिवस हरित ऊर्जेची मागणी वाढत आहे आणि आगामी काळात ती आणखी वाढणार आहे.
केंद्र सरकार हरित ऊर्जेच्या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी नवनवीन योजनाही राबवत आहेत. ज्यामुळे भविष्यात सुझलॉन एनर्जीला (Suzlon Energy) खूप फायदा होऊ शकतो. जर कंपनीमध्ये सर्वकाही व्यवस्थितच सुरू राहिलं तर ही कंपनी आशियामधली सर्वात मोठी पवन ऊर्जा कंपनी बनू शकते.
आता आम्ही तुम्हाला या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्ही कशाप्रकारे गुंतवणूक करू शकता त्याबद्दल सांगणार आहोत.
कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला कोणत्याही कंपनीचं डीमेट खातं उघडावं लागेल. गुंतवणुक करण्यासाठी कित्येक ब्रोकर कंपन्यांचे ॲप्लिकेशन्सही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.  (Suzlon Energy)
◆सुझलॉन कंपनीत गुंतवणूक करणं फायद्याचं की धोक्याचं?
सुझलॉन एनर्जी (Suzlon Energy) ही एक अद्भुत कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणूक करणं हे योग्यच आहे. या कंपनीकडे एक स्ट्रॉंग मॅनेजमेंट आहे. तसंच या कंपनीची आर्थिक स्थितीही भक्कम आहे. ही कंपनी भारतीय पवन ऊर्जा मार्केटमधली एक प्रमुख कंपनी आहे. असं असल्यामुळे भविष्यात कंपनीच्या शेअर्सच्या किमती वाढू शकतात.
तरीही गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची आर्थिक स्थिती आणि भविष्यातल्या आर्थिक फायद्याच्या संधींचा विचार करायला हवा. २००८ साली जे काही मार्केट डाऊन झालं होतं, त्यावेळी कंपनीच्या शेअर्सची किंमत घसरली होती. पण नंतरच्या काळात शेअर्सची किंमत बऱ्यापैकी सुधारली आहे. (Suzlon Energy)
तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल आणि तुम्हाला पवन ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची रुची असेल तर सुझलॉन एनर्जी हा अतिशय योग्य पर्याय असू शकतो. (Suzlon Energy)
◆सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये असलेली जोखीम
जर या कंपनीचं बिझनेस मॉडेल बघितलं आणि तिच्या जोखमीबद्दल म्हणायचं झालं तर कंपनीचं मूलभूत विश्लेषण केल्यावर तुमच्या लक्षात येईल की, कर्जामुळे कंपनी अनेकवेळा आर्थिक संकटात सापडली होती. त्यामुळे कंपनी अगदी कोसळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. पण बँकेने सुझलॉन कंपनीला आणखी एक संधी दिली आहे. म्हणूनच या संधीचा फायदा घेऊन जर कंपनी येणाऱ्या काळात जर चांगली कामगिरी करू शकली नाही तर ती कंपनी पूर्णपणे फ्लॉप होईल. त्यामुळे त्याचा परिणाम शेअर्सवरही दिसू शकतो. (Suzlon Energy)
सुझलॉन एनर्जीच्या (Suzlon Energy) बिझनेसमधला सर्वात मोठा धोका हा आहे की भविष्यात या क्षेत्राच्या वाढीमुळे असंख्य कंपन्या या क्षेत्रात सतत प्रवेश करत राहतील. सुझलॉन एनर्जीला आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो कारण त्यात गुंतवणूक करण्यासाठी खरोखरच काही प्लुटोक्रॅट्स आहेत. कंपनीला तिच्या कर्जामुळे अनेक वेळा आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे.
तरीही आता बँकेने या कंपनीला एक संधी दिली असल्यामुळे त्यात गुंतवणूक करण्यासाठी विचार करायला हरकत नाही. (Suzlon Energy)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.