CM Eknath Shinde: चाकरमान्यांसाठी खुशखबर! गावी जाणाऱ्या भक्तांना यंदाही टोल माफी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

189
CM Eknath Shinde: चाकरमान्यांसाठी खुशखबर! गावी जाणाऱ्या भक्तांना यंदाही टोल माफी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
CM Eknath Shinde: चाकरमान्यांसाठी खुशखबर! गावी जाणाऱ्या भक्तांना यंदाही टोल माफी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केला. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री शिंदे अनेक समाजकल्याणकारी निर्णय घेत आहेत. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.

(हेही वाचा –३५ लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा, DCM Ajit Pawar यांची माहिती)

मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, “राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश देऊन गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफी करावी.” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल.

(हेही वाचा –IndependenceDay2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात निवृत्त नौदल अधिकारी विनायक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण)

शिंदे (CM Eknath Shinde) यावेळी म्हणाले, राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी योजना राबवावी. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराणे बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजवण्यासाठी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.