‘अमृत भारत स्थानक योजने’च्या (Amrit Bharat Station Scheme) यादीत मध्य रेल्वे मार्गावरील दादर, हार्बर मार्गावरील पनवेल आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि दहिसर या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत या ४ रेल्वेस्थानकांचा कायापालट होईल.
(हेही वाचा उत्तर प्रदेशात Muslim जमावाने पोलिसांवर दगडफेक करून ड्रग्ज तस्कराची केली सुटका)
रेल्वे मंत्रालयाने ‘अमृत भारत स्थानक योजना’ (Amrit Bharat Station Scheme) राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत देशभरातील १ हजार ३२४ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील १२८ रेल्वे स्थानकांचा समावेश झाला आहे. यामध्ये प्रवासी क्षेत्र, शौचालये, लिफ्ट किंवा एस्कलेटर (सरकते जिने), स्वच्छता, वाय-फाय इंटरनेट सुविधा, स्थानिक उत्पादनांसाठी ‘किऑस्क’ (विशिष्ट उद्देशासाठी उभारलेला बूथ), ‘एक स्थानक एक उत्पादन’, माहिती प्रणाली, ‘एक्झिक्युटिव्ह लाऊंज’ (विश्रांतीची जागा) इत्यादीद्वारे स्थानकावरील आवश्यकता लक्षात घेतल्या जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community