Waqf Board Bill : वक्फ बोर्ड विधेयकावर शिवसेना उबाठाची कोंडी

गेल्या काही दिवसांत महायुती विशेषतः भाजपाच्या आमदारांनी उबाठाला वक्फ् बोर्ड विधेयकावर भूमिका स्पष्ट न केल्याबद्दल कोंडीत पकडले आहे.

276

वक्फ् बोर्ड कायद्यात सुधारणा सुचविणारे विधेयक लोकसभेत मांडण्यात आल्यानंतर शिवसेना उबाठाच्या खासदारांनी संसदेतून पळ काढला. शिवसेना उबाठा या विधेयकावर मत व्यक्त करण्यास टाळाटाळ करत असून विधेयकाला पाठींबा दिला किंवा विरोध केला तरी उबाठाची कोंडी होणार, एवढे नक्की.

कॉँग्रेससह राष्ट्रवादी कॉँग्रेसचा विरोध

देशभरात वक्फ् बोर्डाच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात जमीन असून काही मालमत्ता वादात असल्याने केंद्र सरकारने या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक लोकसभेत सादर केले. मात्र कॉँग्रेससह राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि अन्य विरोधी पक्षांनी त्यावर आक्षेप घेतल्याने विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे फेरविचारार्थ पाठवण्यात आले.

खासदार द्विधा मनस्थितीत

महाविकास आघाडीतील कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस (शप) गट यांनी लोकसभेतच या विधेयकाला स्पष्टपणे विरोध केला. त्यावेळी शिवसेना उबाठाच्या नऊ खासदारांना पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. यामुळे उबाठाच्या खासदारांमध्ये नाराजी व्यक्त होत असून त्यांचीही द्विधा मनस्थितीत सापडल्याचे बोलले जात आहे. मराठी माणूस आणि त्यानंतर हिंदूंच्या रक्षणासाठी लढणारी संघटना म्हणून प्रतिमा असलेले ठाकरे आता मुस्लिम मतांसाठी हिंदूंच्या बाजूने ठाम भूमिका घेण्यास कचरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(हेही वाचा Baloch Liberation Army attack : बलुचिस्तानमध्ये पाकचा राष्ट्रध्वज विकणार्‍या दुकानावर आक्रमण; ३ जण ठार)

ठाकरेंच्या निषेधार्थ ‘मातोश्री’बाहेर निदर्शने

गेल्या काही दिवसांत महायुती विशेषतः भाजपाच्या आमदारांनी उबाठाला वक्फ् बोर्ड विधेयकावर भूमिका स्पष्ट न केल्याबद्दल कोंडीत पकडले आहे. काही मुस्लिम संघटनांनी उबाठा खासदारांच्या पळपुटया भूमिकेवर उद्धव ठाकरे यांचा निषेध व्यक्त करत ‘मातोश्री’बाहेर निदर्शने केली.

कॉँग्रेस-राष्ट्रवादीची अडचण

उबाठाने वक्फ् बोर्ड सुधारणा विधेयकाला पाठींबा देण्याची भूमिका घेतली तर मुस्लिम समाज नाराज होईल त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील कॉँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादीची अडचण होऊ शकते. तर विधेयकाला विरोध केल्यास हिंदू समाज उबाठाला मतदान करणे कठीण होईल, अशा कोंडीत उबाठा सापडली असल्याचे चित्र आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.