Uddhav Thackeray यांच्यावर प्रचाराची जबाबदारी म्हणजे मविआचे जहाज बुडाले समजा; संजय शिरसाट यांचा टोला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत जाऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. या भेटीत काँग्रेसने त्यांच्यापुढे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी देण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीला उपरोक्त टोला हाणला आहे.

149
काँग्रेसने महाविकास आघाडीच्या प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या खांद्यावर टाकण्याचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना छेडले असता त्यांनी उद्धव ठाकरे हे विरोधकांचे प्रचारप्रमुख असतील तर त्यांचे जहाज बुडालेच म्हणून समजा असा टोला हाणला.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत जाऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. या भेटीत काँग्रेसने त्यांच्यापुढे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी देण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीला उपरोक्त टोला हाणला आहे.
त्यांचीही जबाबदारी घेण्याची मानसिकता नाही. महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे प्रचाराची धुरा सोपवली असेल तर मग त्यांचे जहाज बुडालेच म्हणून समजा. त्यांच्या विभागनिहाय 4 सभा होतील आणि प्रचार संपेल. त्यामुळे काँग्रेस व शरद पवार त्यांच्याकडे धुरा वगैरे काहीही देणार नाहीत. विशेष म्हणजे ठाकरेंची स्वतःचीही अशी एखादी जबाबदारी घेण्याची मानसिकता नाही. खऱ्या अर्थाने लोकांना प्रश्न पडत आहे की, उद्धव ठाकरे साहेब आहेत की संजय राऊत आहेत, असे संजय शिरसाट म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.