Kolkata doctor rape प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याचा दावा

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या एका ऑडिओ क्लिपमध्ये मयत डॉक्टर तरुणी रुग्णालयात चालणाऱ्या एका रॅकेटची बळी ठरली आहे, असा दावा करण्यात आला आहे.

201
कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या (Kolkata doctor rape case) हा एक कट आहे. या कटातील सूत्रधाराकडून ज्या ठिकाणी घटना घडली तेथील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा ‘पाचजन्य समाचारपत्र’ या वृत्तपत्राने  ‘एक्स’वर केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये रुग्णालयात ड्रग्जचे रॅकेट सुरू असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे देण्यात आला आहे. सीबीआयकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेतली जात आहे. सीबीआयकडून लवकरच या क्रूर घटनेमागे कोण आहे, याचा खुलासा होऊ शकतो असे एका विश्वसनिय सूत्रांनी म्हटले आहे.

महिलेच्या आवाजात ऑडिओ क्लिप व्हायरल 

पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या आठवड्यात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या करण्यात आली आहे, या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला असून कोलकत्ता पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक देखील केली आहे. मृत डॉक्टरचे शवविच्छेदन अहवालात तिला क्रूरपणे मारहाण करण्यात आली, त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. मृत डॉक्टरच्या शरीरावर अंतर्गत जखमा आढळून आल्या आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका ऑडिओ क्लिपमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ही डॉक्टर तरुणी रुग्णालयात चालणाऱ्या एका रॅकेटची बळी ठरली आहे, ही ऑडिओ क्लिप बंगाली भाषेत महिलेच्या आवाजात आहे, ही ऑडिओ क्लिप कोलकत्तामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Kolkata doctor rape case)

(हेही वाचा उर्दू भाषेसाठी कोट्यवधींची खैरात; Sanskrit भाषेचे पुरस्कार मात्र अनुदानाअभावी बंद करण्याची वेळ)

दरम्यान पांचजन्य समाचारपत्राने एक्स हँडलवर दावा केला आहे की, कोलकत्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर झालेल्या क्रूरतेनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, या समाचारपत्राने असाही दावा केला आहे की, कोलकाता पोलिसांनी प्रथम या प्रकरणाला आत्महत्या म्हटले होते, परंतु डॉक्टरांच्या निदर्शनानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून सीबीआयच्या अधिकारी यांनी गुरुवारी घटनास्थळाला भेट दिली आहे. सीबीआयकडून सर्व बाजूने तपास करण्यात येणार असून लवकरच या हत्याकांडाच्या सुत्रधारापर्यत सीबीआय पोहचतील असे सांगण्यात येत आहे.  (Kolkata doctor rape case)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.