मुंब्र्यात तिरंगा मिरवणुकीत Tipu Sultan चे पोस्टर

224
ठाणे येथील मुंब्रा परिसरात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या संघटनेने  तिरंगा मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत तिरंगा झेंडा आणि महापुरुषांच्या पोस्टरसोबतच टिपू सुलतानचे (Tipu Sultan) पोस्टर दिसून आले. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात लावण्यात आलेले टिपू सुलतानचे पोस्टर पालिका प्रशासनाने काढून टाकले होते.
मुंब्रा शहरात दोन दिवसांपूर्वी टिपू सुलतानचे  (Tipu Sultan) पोस्टर लावण्यात आलेले होते. हे पोस्टर पालिका प्रशासनाने काढून टाकले होते. हा विषय चर्चेत असतानाच, गुरुवारी सकाळी मुंब्रा शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त निघालेली तिरंगा मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या संघटनेने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तिरंगा मिरवणूक काढली होती. मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा अशी ही मिरवणूक काढण्यात आली.  या मिरवणुकीत दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तींच्या हातात तिरंगा झेंडे आणि अनेक महापुरुषांचे पोस्टर होते. यामध्ये टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) पोस्टरचाही समावेश होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.