Kolkata Doctor Rape प्रकरणी टीएमसी नेत्याचे संतापजनक वक्तव्य; म्हणाला…

251

पश्चिम बंगालमच्या कोलकातामधील आर.जी. कर रुग्णालयात महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या (Kolkata Doctor Rape) करण्यात आली. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले आहेत. देशभरातील विविध ठिकाणी कँडल मार्च, मोर्चे काढण्यात आले. संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असताना दुसरीकडे मात्र तृणमूल काँग्रेस (TMC) नेते कुणाल घोष यांनी अतिशय संतापजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी कोलकाता डॉक्टरच्या हत्या आणि लैंगिक अत्याचाराबाबत बोलताना, बलात्कार दुसऱ्या राज्यातही होतात. एक राज्य सांगा जिथे बलात्कार होत नाहीत? असा सवाल करत, रेप कहा नही होते? असे संतापजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

(हेही वाचा उर्दू भाषेसाठी कोट्यवधींची खैरात; Sanskrit भाषेचे पुरस्कार मात्र अनुदानाअभावी बंद करण्याची वेळ)

काय म्हणाले कुणाल घोष? 

कुणाल घोष यांनी १५ ऑगस्टला गुरुवारी बोलताना सांगितले की, हाथरस आणि उन्नावमध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेश सरकारने कोणतेही पाऊल उचलले नव्हते. त्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांची हत्या करण्यात आली होती. मात्र पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व आवश्यक ती पावले उचलली असून त्यांनी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी सरकारची बाजू घेत कुणाल घोष यांनी, मुख्यमंत्र्यांनी घटनेनंतर त्वरित कारवाई केल्याचे म्हटले आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली. बलात्कार दुसऱ्या राज्यातही होतात. एक राज्य सांगा जिथे बलात्कार होत नाहीत?, असे घोष म्हणाले. (Kolkata Doctor Rape)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.