एकेकाळी सर्वाधिक मागणी असलेल्या कला शाखेला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. अकरावी प्रवेशाच्या गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबई विभागातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी (Student) जेमतेम १० टक्के विद्यार्थी पुढील अभ्यासक्रमासाठी आर्ट्सची निवड करीत असल्याचे दिसते. सहज नोकऱ्या मिळवून देणारी आणि ‘प्रतिष्ठे’ची म्हणून कॉमर्स शाखेला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती आहे.
(हेही वाचा उर्दू भाषेसाठी कोट्यवधींची खैरात; Sanskrit भाषेचे पुरस्कार मात्र अनुदानाअभावी बंद करण्याची वेळ)
काही वर्षांपूर्वीपर्यंत सायन्सखालोखाल आर्ट्स शाखेला मान होता. सायन्सला प्रवेश न मिळणारे विद्यार्थी (Student) हमखास आर्ट्सला प्रवेश घेत पुढील वाटचाल करायचे. मात्र, बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे मुंबई विभागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विश्वात आर्ट्सचेच नव्हे, तर सायन्सचेही स्थान कॉमर्सने पटकावल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास एकूण विद्यार्थ्यांमध्ये आर्ट्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची (Student) टक्केवारी ९.६० ते ९.९७ टक्के एवढीच आहे. कॉमर्सला प्रवेश घेणाऱ्यांच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसत असली, तरी एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५३ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कॉमर्सला पसंती दिली आहे. सायन्स शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत वाढले असून, सध्या ते ३७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यंदा अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या दोन लाख २० हजार ७२२ विद्यार्थ्यांपैकी (Student) फक्त २१ हजार ७६३ म्हणजेच ९.८५ टक्के विद्यार्थ्यांनी आर्ट्सची निवड केली, तर एक लाख १३ हजार ९१५ म्हणजेच तब्बल ५१.६१ टक्के विद्यार्थ्यांचा कल कॉमर्सकडे आहे.
Join Our WhatsApp Community