कोलकात्यात (Kolkata Rape Case) आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) 17 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच आयएमएने रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. आयएमएने एक पत्रक काढून 17 ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा 17 ऑगस्ट सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
केवळ अत्यावश्यक सेवा सुरू
तसेच आजपासून देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तब्बल 24 तास सेवा बंद राहणार आहे. या दरम्यान अत्यावश्यत सेवा सुरू राहणार आहे. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत. (Kolkata Rape Case)
IMA एकजुटीने या संपामध्ये उतरणार
इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा आणला पाहिजे. जवळपास 25 राज्यांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदे असले, तरी ते त्याची अंमबजावणी होताना दिसत नाही. हॉस्पिटलमध्ये 50 टक्के महिला डॉक्टर असतील तर महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. (Kolkata Rape Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community