इस्रो (ISRO) १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९:१७ वाजता श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून SSLV-3 रॅाकेटचे प्रक्षेपण करणार आहे. या मोहिमेअंतर्गत इस्रोच्या या उपग्रहाचा कालावधी १ वर्ष असून हे सॅटेलाईट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणत: ४७५ किमी अंतरावर घिरट्या घालणार आहे. त्याचबरोबर हा उपग्रह अवकाशात पोहोचवण्यासाठी एसएसएलव्ही (SSLV) रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे.
🚀SSLV-D3/EOS-08🛰️ Mission:
The launch of the third developmental flight of SSLV is scheduled for August 16, 2024, in a launch window of one hour starting at 09:17 Hrs. IST pic.twitter.com/JWxq9X6rjk
— ISRO (@isro) August 12, 2024
या मोहिमेची मदत ‘मिशन गगनयान’ मध्येही
या सॅटेलाईटचे वजन १७५.५ किलोग्रॅम असल्याची माहिती मिळत आहे. तसेच इस्रोच्या या सॅटेलाईटमुळे वातावरणाचे निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर तांत्रिक गोष्टींसंदर्भात महत्त्वाचे योगदान दिले जाणार आहे. इस्रोच्या EOS-8 या मोहिमेची मदत वणवा, ज्वालामुखी या आणि अशा अनेक संकटांसह त्सुनामी, वादळ, समुद्राच्या पृष्ठावरील वादळ याचे विश्लेषण करत यंत्रणांना सावध करण्यासाठी होणार आहे. जमिनीतील आर्द्रता आणि पूरस्थिती यासोबतच अनेक गोष्टींमध्ये मदत करणाऱ्या या मोहिमेची मदत मिशन गगनयान (Mistion Gaganyan) मध्येही मिळणार आहे. (ISRO)
नेमकी प्रक्रिया काय?
SSLV रॉकेट 500 किमीच्या कक्षेत लघु, सूक्ष्म किंवा नॅनो उपग्रह (10 ते 500 किलो वजनाचे) प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. रॉकेटचे तीन टप्पे घन इंधनाने चालतात तर अंतिम वेग ट्रिमिंग मॉड्यूल (VTM) द्रव इंधन वापरते. लिफ्टऑफच्या 13 मिनिटांनंतर, रॉकेट EOS-08 त्याच्या कक्षेत सोडेल आणि सुमारे तीन मिनिटांनंतर, SR-0 वेगळे होईल. दोन्ही उपग्रह 475 किमी उंचीवर रॉकेटपासून वेगळे होतील. (ISRO)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community