Period leave : ‘या’ राज्यात मिळणार ‘पीरियड्स लिव्ह’, केव्हापासून निर्णय लागू? वाचा सविस्तर…

146
Period leave : 'या' राज्यात मिळणार ‘पीरियड्स लिव्ह’, केव्हापासून निर्णय लागू? वाचा सविस्तर...
Period leave : 'या' राज्यात मिळणार ‘पीरियड्स लिव्ह’, केव्हापासून निर्णय लागू? वाचा सविस्तर...

ओडिशा सरकारने सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी एक दिवसांची ‘पीरियड्स लिव्ह’ (Period leave) देण्याची घोषणा केली आहे. ओडिशाच्या उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. या सुट्टीचा उद्देश्य मासिक पाळी (Menstrual Leave) दरम्यान महिलांना होणाऱ्या शारीरिक मानसिक आव्हानांना लक्षात घेऊन घेण्यात आला असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री परिदा यांनी म्हटले आहे.

हा निर्णय सरकारी, खासगी कंपन्यांनाही लागू होणार
कटक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलताना त्या म्हणाल्या की, आजपर्यंत महिलांना पीरियड्स काळात सुट्टी मिळत नाही. आता एक दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या अंतर्गत महिला मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी त्या सुट्टी घेऊ शकतील. मात्र ही रजा ऐच्छिक असेल म्हणजेच ज्यांना हवी असेल त्यांनाच तरच मिळेल. हा निर्णय सरकारी तसेच खासगी कंपन्यांनाही लागू होणार आहे. (Period leave)

ओडिशाच्या आधी केरळ व बिहार राज्यात हा निर्णय लागू करण्यात आला
आतापर्यंत मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी दिली जात नव्हती. मात्र आता सरकारने निर्णय घेतला आहे की, या काळात महिलांना सुट्टी दिली जावी. महिला आपल्या आवश्यकतेनुसार सुट्टी घेऊ शकतात. दरम्यान महिलांनी यासाठी अर्ज केल्यानंतरच ही सुट्टी दिली जाईल. ओडिशाच्या आधी केरळ व बिहार राज्यात हा निर्णय लागू करण्यात आला आहे. बिहारमध्ये याची सुरुवात १९९२ मध्येच झाली होती. याअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला दोन दिवसांची पीरियड्स लीव दिली जाते. तर केरळमध्ये २०२३ पासून याची सुरूवात केली आहे. केरळमधील सर्व विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळी रजा दिली जाते. त्याचबरोबर १८ वर्षाहून अधिक वयाच्या महिलांना ६० दिवसांची मातृत्व रजा दिली जाते. (Period leave)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.