Infosys Narayan Murthy : पत्नीकडून १०,००० रुपये घेऊन सुरू केलेली इन्फोसिस, कंपनीचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहे?

Infosys Narayan Murthy : नारायण मूर्ती यांना भारतीय माहिती - तंत्रज्जान व्यावसायाचे प्रणेते समजलं जातं 

150
Infosys Narayan Murthy : पत्नीकडून १०,००० रुपये घेऊन सुरू केलेली इन्फोसिस, कंपनीचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहे?
Infosys Narayan Murthy : पत्नीकडून १०,००० रुपये घेऊन सुरू केलेली इन्फोसिस, कंपनीचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहे?
  • ऋजुता लुकतुके

संगणक विज्जानात शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीला नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचा ओढा शिक्षण क्षेत्राकडेच होता. कारण, हा विषय महत्त्वाचा असला तरी समोर करिअर म्हणून विषय शिकवणं ही एकमेव संधी होती. पण, याचा व्यवसाय कसा करायचा आणि भारत या क्षेत्रात काय योगदान देऊ शकतो, याची कल्पना नारायण मूर्ती यांना आली. जागतिक कंपन्या तोपर्यंत भारतात पाय रोवत होत्या. आणि पटनी कंप्युटर्स ही भारतीय कंपनीही सुरू होती. (Infosys Narayan Murthy)

(हेही वाचा- ISRO: आता भारताला ऐकू येणार पृथ्वीच्या हृदयाचे ठोके, इस्रो काय सरप्राईज देणार?)

पण, आयआयएम अहमदाबाद इथं कार्यरत असताना एक प्रकल्प नारायण मूर्ती यांनी हाताळला. आणि तिथून त्यांच्या डोक्यात व्यवसायाची बीजं रोवली गेली. त्या विश्वासावर त्यांनी सॉफ्ट्रॉनिक्स ही कंपनीही सुरू केली होती. पण, दीड वर्षांत ती बंद करावी लागली. आणि पुणे इथं पटनी कम्प्युटर्समध्ये नारायण मूर्ती यांना नोकरी पत्करावी लागली. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काय करू शकतो हे नारायण मूर्ती यांना समजलं होतं. पण, उद्योजकतेची मोट बांधणं शक्य होत नव्हतं. (Infosys Narayan Murthy)

अखेर सात समविचारी अभियंत्यांबरोबर बंगळुरुच्या एका गॅरेजमध्ये मूर्ती यांनी पुढाकार घेऊन इन्फोसिस सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी लागलेली १०,००० रुपयांची रक्कम त्यांनी पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून उधार घेतली. कंपनी सुरू करतानाच भारत या क्षेत्रात काय योगदान देऊ शकतो, याची पूर्ण कल्पना मूर्ती यांना होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच भारतीय आयटी सेवा क्षेत्र विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. आणि जगभरातील आयटी सेवा मागणी असलेल्या देशांशी संपर्क सुरू केला. (Infosys Narayan Murthy)

(हेही वाचा- Period leave : ‘या’ राज्यात मिळणार ‘पीरियड्स लिव्ह’, केव्हापासून निर्णय लागू? वाचा सविस्तर…)

ती दृष्टी नारायण मूर्ती यांना असल्यामुळे इन्फेसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून १९८१ ते २००२ पर्यंत ते कार्यरत होते. तर २००२ ते २००६ या काळात ते संचालक मंडळात अध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीत झपाट्याने काम करत त्यांनी आयटी सेवांची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढवली. आणि त्याचं एक मॉडेल देशात उभारलं ज्याचं इतर कंपन्यांनीही अनुकरण केलं. आयटी क्षेत्रासाठी भारत ही जागतिक ओळख निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. (Infosys Narayan Murthy)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.