HDFC Full Form : एचडीएफसी बँकेचा फुल फॉर्म नेमका काय आहे? स्थापना कशी झाली?

HDFC Full Form : गृहकर्जाच्या क्षेत्रातील भारताची ही सगळ्यात मोठी बँक आहे 

343
HDFC Full Form : एचडीएफसी बँकेचा फुल फॉर्म नेमका काय आहे? स्थापना कशी झाली?
HDFC Full Form : एचडीएफसी बँकेचा फुल फॉर्म नेमका काय आहे? स्थापना कशी झाली?
  • ऋजुता लुकतुके

एचडीएफसी ही भारतातील एक अग्रगण्य बँक आहे. एचडीएफसी म्हणजे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. मुंबईत मुख्यालय असलेली ही बँक ही देशातील गृहकर्ज वितरणातील सगळ्यात मोठी बँक आहे. सुरुवातीला गृह कर्ज वितरणाच्या उद्देशाने स्थापन झालेली ही बँक हळू हळू इतर बँकिंग व्यवसायातही नावारुपाला आली. देशातील २,४०० शहरं आणि गावांनी सेवा पुरवण्यासाठी बँकेनं देशभरात ३९६ शाखा उभारल्या आहेत. तर अनिवासी भारतीयांच्या सोयीसाठी कंपनीच्या लंडन, सिंगापूर आणि दुबईतही शाखा आहेत. (HDFC Full Form)

(हेही वाचा- Infosys Narayan Murthy : पत्नीकडून १०,००० रुपये घेऊन सुरू केलेली इन्फोसिस, कंपनीचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहे?)

एचडीएफसी ही देशातील सगळ्यात मोठी खाजगी बँक असून कंपनीचे १,२०,००० कर्मचारी आहेत. १९९४ मध्ये या बँकेची स्थापना झाली. आणि अल्प उत्पन्न गट तसंच मध्यमवर्गीयांना घर खरेदीसाठी तसंच बांधकाम व्यावसायिकांना गृहनिर्माण वसाहती स्थापन करण्यासाठी कर्ज उपलब्घ करून देण्यासाठी या बँकेची स्थापना झाली होती. (HDFC Full Form)

एचडीएफसी बँक लिमिटेड, एचडीएफसी अर्गो जनरल इन्श्युरन्स, एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ, एचडीएफसी क्रेड, गृह फायनान्स तसंच क्रेडिला फायनान्स सर्व्हिसेस या कंपनीच्या मुख्य उपकंपन्या आहेत. कंपनीची बँकिंग सेवा ही २,८६६ शहरांमध्ये पसरली असून ५,४८५ शाखा आणि १४,५३३ एटीएम केंद्रांमधून कंपनी ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवते. (HDFC Full Form)

(हेही वाचा- Hindustan Unilever Owner : लाईफबॉय, पिअर्स ते पाँड्‌स अशा ब्रँड्सचे मालक नेमके कोण आहेत?)

बचत खातं, मुदतठेव खातं या बँकिंग सेवांबरोबरच एचडीएफसी बँक ग्राहकांना म्युच्युअल फंड, जनरल विमा, आरोग्य विमा, आयुर्विमा, मॉर्टगेज सेवा, शैक्षणिक कर्ज तसंच डीमॅट सेवाही पुरवते.  (HDFC Full Form)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.