आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मविआने (MVA) कंबर कसली असून, महाविकास आघाडीने मुंबईतील ष्णमुखानंद सभागृहात पहिला मेळावा पार पडला. या मेळाव्यातील पहिल्या भाषणाचा मान उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) देण्यात आला. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाषणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर खोचक टीका केली. राऊतांनी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojna) निशाणा साधला आहे.
एक तर भगवा चालेल नाहीतर…
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला आता पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो अचानक ते गुलाबी झाले. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे पण ते कुठे जाणार आहे हे माहीत नाही. पण एक सांगतो गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जीण नाही. आपला रंग भगवाच आहे. केसीआर यांचा पिंक रंग होता त्यांना सुद्धा आम्ही बोललो पिंक नही चलेंगा… एक तर भगवा चालेल नाहीतर तिरंगा चालेल. भगवाचं तिरंग्याला वाचवेल, असे बाळासाहेब म्हणायचे. महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हातमिळवणी करेल त्यांना रस्त्यावर ठोकयचे. विधानसभा निवडणुका जिंकल्यावर रस्त्यावर दिसले नाही पाहिजे.” असे संजय राऊत म्हणाले.
लाडकी बहीण सारख ढोंग कधीच पाहिला नाही
“लाडकी बहीण सारख ढोंग कधीच पाहिला नाही. अनेक योजना आल्या आहे. सरकारी पैशाने मतं विकत घेण्याची ही योजना आहे. आमचा नातं पैशाच्या पलीकडे आहे.सरकार आपला येणार आणि अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील यांना माहिती आहे की पैसे तिजोरीत नसताना आणायचे कसे? पैसा येईल आमच्याकडे काळजी करू नका. महाविकास आघडीची एटीएम मशीन माझ्या मागे बसली आहे.” (Sanjay Raut)
“आपल्या वक्तव्याने मोदींच्या 56 इंचाच्या छातीची आठवण केली. स्वत: मोदीच विसरले आहेत. ती छातीच नाही. तो मातीचा रिकामा खोका आहे. नुसती छाती जरी असती तर देशाची ही अवस्था झाली नसती. मोदी लालकिल्ल्यावर भाषण करत होते आणि जम्मू काश्मीरमध्ये जवानांचे बलिदान झाले. 30 दिवसात 27 हल्ले झाले. 17 जवान शहीद झाले. अनेक घायाळ झाले. हे 56 इंचाच्या छातीचं सरकार आहे. त्यांच्या छातीतील हवा आपण काढून टाकली आहे.” असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community