-
मुंबई प्रतिनिधी
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मविआने कंबर कसली असून, महाविकास आघाडीने मुंबईतील ष्णमुखानंद सभागृहात पहिला मेळावा पार पडला. या मेळाव्यातील पहिल्या भाषणाचा मान उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) देण्यात आला.त्यामुळे ठाकरेंनी नाना पटोले (Nana Patole) यांना उद्देशून, तुम्ही मघाशी नव्हतात. मी बोललो की, मुख्यमंत्री कोण होणार ? आज काँग्रेस (Congress) आणि शरद पवार गटाने (Sharad Pawar group) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा. मी त्याला पाठींबा सगळ्यांच्यासमोर द्यायला तयार आहे, असं म्हणत ठाकरेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडत पटोलेंना चिमटा काढला.
यावेळी ठाकरेंनी विधानसभेच्या जागावाटपापासून ते मोदी सरकारपर्यंतच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची पहिल्यांदाच संयुक्त मेळावा होत आहे म्हणून यजमानपद स्वीकारुया असा मी विचार केल्याचे सांगतले. (Uddhav Thackeray)
जागावाटपावरून आपसात वाद नको
यावेळी ठाकरेंनी ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला. त्यासाठी माझी काहीही हरकत नाही असे सांगितले. तसेच लोकसभेत सांगलीच्या जागेवरून झालेल्या गदारोळानंतर आज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आणि सर्वांना जागावाटपवरून भांडण करू नका, कामात वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. असे सांगत ज्या पक्षाला जी जागा सुटले त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम करा असे सांगितले. (Uddhav Thackeray)
विरोधकांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतली आहे. काँग्रेसचा हात, सेनेची मशाल, आणि पवार साहेबांचा हातात तुतारी असलेला मावळा गावागावात पोहोचवा असे ठाकरे म्हणाले. काँग्रेस आणि शरद पवार गटाने (Sharad Pawar group) आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा पण जागा वाटपात भांडण करू नये, अशी आशाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. (Uddhav Thackeray)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community