Golden Chariot या लक्झरी ट्रेनचे तिकीट भाडे किती आहे? आणि काय काय सुविधा मिळतात?

86
Golden Chariot या लक्झरी ट्रेनचे तिकीट भाडे किती आहे? आणि काय काय सुविधा मिळतात?

Golden Chariot ही भारतीय रेल्वेची एक राजेशाही ट्रेन आहे, जी कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळ (KSTDC) द्वारे चालविली जाते. ही ट्रेन दक्षिण भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांचा प्रवास करते. ही ट्रेन फिरता राजवाडा म्हणून ओळखली जाते.

२३ जानेवारी २००८ रोजी बंगळुरू ते गोवा हा पहिला प्रवास घडला. या ट्रेनमध्ये जिम, स्पा आणि इतर लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे या ट्रेनचे भाडे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. २०२० मध्ये, IRCTC ने ऑपरेशन, मार्केटिंग, देखभालीसाठी ताबा घेतला आणि त्यानंतर या ट्रेनला नवीन स्वरूप देण्यात आले.

(हेही वाचा – havells cooler : भारतात मिळणारे havells चे सर्वोत्कृष्ट cooler)

प्रत्येकाचं स्वप्न असतं की आयुष्यातून एकदा तरी या ट्रेनमधून प्रवास करता यावा. Golden Chariot ट्रेनमधील कोरीव काम हंपी, होसल्या मंदिर आणि हळेबीड मंदिरांसारखे आहे. या ट्रेनमध्ये सुंदर खोल्या आहेत व खोल्यांमध्ये महागडा बेड, टेबल, खुर्च्या इ. बसण्यासाठी व खाण्यासाठी स्वतंत्र हॉल व मोकळी प्रशस्त जागा. जेवणाची व्यवस्था देखील उत्कृष्ट आहे, इथे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ उपलब्ध आहेत.

या ट्रेनच्या निमिर्तीत सुमारे ३८ कोई रुपये खर्च झाले आहेत. भारताची ही शाही ट्रेन दक्षिण भारताच्या वैभवशाली वारशाची आठवण करून देते. ट्रेनच्या प्रत्येक डब्याचे नाव दक्षिणेतील मुख्य राजवंशांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. जसे की संगमा, विजयनगर, सातवाहन, यदुकुल, भहमानी, राष्ट्रकोटा, होयसल, चालुक्य, गंगा इ.

(हेही वाचा – andharban trek : अंधारबन ट्रेकबद्दल जाणून घ्या सगळं काही… आणि घ्या तुमच्या ट्रेकिंगचा मनसोक्त आनंद!)

ट्रेनमध्ये एक रॉयल बार आहे, जिथे तुम्ही कॉकटेल पार्ट्यांचा आनंद घेऊ शकता. ट्रेनमध्ये कॉन्फरन्स रूम आणि टीव्हीही बसवण्यात आले आहेत. एका राजवाड्यात जे जे असते आणि माणसासाठी जी सुविधा असते, ते ते सर्व इथे उपलब्ध होते. विमानापेक्षाही या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद वेगळाच आहे.

या ट्रेनच्या तिकीटाचे भाडे खूप महाग आहे. प्राइड ऑफ कर्नाटक पॅकेज डिलक्स केबिनमध्ये ५ रात्र आणि ६ दिवसाठी विशेष पॅकेज दिला जातो, यामध्ये दोन व्यक्तींनी एकत्र प्रवास केल्यास भाडे ३,९८,१६० रुपये आहे. तर एकट्याने प्रवास केल्यास २,९९,०४० रुपये द्यावे लागतील. त्यामुळे ही ट्रेन श्रीमंतांची ट्रेन म्हणूनही ओळखली जाते. काय मग, या भव्य आणि राजेशाही ट्रेनमधून प्रवास करायला तुम्हाला आवडेल ना?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.