राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) प्रचारसभांची रणधुमाळी सुरू झाली असून, महाविकास (MVA) आघाडीने १६ ऑगस्ट रोजी प्रचार सभेचा नारळ फोडला आहे. तर महायुती सरकार (Mahayuti) कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन २० ऑगस्ट रोजी प्रचारसभेचा नारळ फोडणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीने शुक्रवारी मुंबईत एकत्र येत मेळावा घेतला. विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. तसेच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून मविआमध्ये आणि राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा आणि नावं पुढे येत होती. अशातच आता शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिलं भाषण करून शुक्रवारी मोठी घोषणाच केली आहे. (Nana Patole)
(हेही वाचा – Ladki Bahin Yojana चे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये महिलांची गर्दी)
शिवसेना उबाठा गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिलं भाषण करून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावर भाष्य केलं आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुद्दामून हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या माध्यमातून आता हा विषय चर्चेत राहील, पण मुख्यमंत्री चेहरा कोण असेल हे जेष्ठ नेते मिळून ठरवतील आणि अंतिम निर्णय घेतील. असे म्हणत नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे एका वाक्यात सांगितलं आहे. (Nana Patole)
(हेही वाचा – National Film Awards 2024 : ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी जाहीर; ‘हा’ ठरला सर्वोकृष्ट मराठी सिनेमा)
मुंबईतील षणमुखानंद हॉल येथे महाविकास आघाडीने मेळावा घेत प्रचार सभेचा पहिला नारळ फोडला. यावेळी कॉँग्रेस, उबाठा गटासह, शरदचंद्र पवार गटामधील नेतेमंडळी उपस्थित होते. (Nana Patole)
हेही पाहा –