आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस सिलेंडर’ तर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाला ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
(हेही वाचा – शहरी भागात बचतगटांची संख्या वाढवावी; CM Eknath Shinde यांचे निर्देश)
निवडणूक आयोगाने शुक्रवारी (१६ ऑगस्ट) निवडणूक चिन्हाबाबतची घोषणा केली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना वेगवेगळ्या निवडणूक चिन्हावर लढावे लागले होते. पक्षाचे नेते खुद्द प्रकाश आंबेडकर यांना अकोला लोकसभा मतदारसंघात ‘प्रेशर कुकर’ हे चिन्ह मिळाले होते. त्यामुळे आंबेडकर यांनी मध्यंतरी नवी दिल्लीत जाऊन विधानसभा निवडणुकीला (Assembly Elections) ‘गॅस सिलेंडर’ हे निवडणूक चिन्ह देण्याची विनंती केली होती. ही विनंती आयोगाने मान्य केल्याने वंचितला मोठा दिलासा मिळाला आहे.
(हेही वाचा – बारामतीच्या मोठ्या ताईंना दीड हजाराचे मोल कळणार नाही; Chitra Wagh यांचा घणाघात)
प्रहार जनशक्ती पक्षाने लोकसभा निवडणूक शिट्टी या चिन्हावर लढवली होती. आता या पक्षाला ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. सध्या मावळत्या विधानसभेत प्रहार जनशक्तीचे दोन आमदार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community