Maharashtra Rain Update: राज्यात पाऊस ‘नाराज’; काय सांगतो हवामान खात्याचा ताजा अंदाज? वाचा सविस्तर

175
Maharashtra Rain Update: राज्यात पाऊस ‘नाराज’; काय सांगतो हवामान खात्याचा ताजा अंदाज? वाचा सविस्तर
Maharashtra Rain Update: राज्यात पाऊस ‘नाराज’; काय सांगतो हवामान खात्याचा ताजा अंदाज? वाचा सविस्तर

मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. जुलै महिन्यात राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याचे दिसून येत आहे. कारण महाराष्ट्रात सध्या पावसाचे दिवस सुरू असले तरी देखील काही जिल्ह्यांमधून मात्र पावसाने काढता पाय घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र अशातच आता हवामान विभागाने पावसासंदर्भात एक महत्वाचा अंदाज वर्तवला आहे. (Maharashtra Rain Update)

(हेही वाचा – Nashik मध्ये हिंदूंच्या बंदला गालबोट; आंदोलकांवर दगडफेकीमुळे तणाव)

जुलैअखेरीस कोसळलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा उकाडा वाढला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई तसेच ठाणे, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहर तसेच उपनगरांत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पाऊस झाला. मात्र, त्यानंतर नागरिकांना पावसाची प्रतीक्षा कायम राहिली आहे. काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हवा तसा मुसळधार (Heavy Rain) पाऊस पडलेला नाही. यामुळे मुंबईकरांना उकाडा सोसावा लागत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत अशीच स्थिती कायम असणार आहे. मात्र काही भागात हलक्या सरी कोसळतील.

(हेही वाचा – इंडी आघाडी म्हणजे बलात्कारी बचाव आघाडी; Prem Shukla यांचा हल्लाबोल)

IMD  (India Meteorological Department) च्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस मुंबई, ठाणे व पालघरसह भागात देखील पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील बदलते वातावरण पाहता सप्टेंबर महिन्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. असा अंदाज हवामान खात्याकडून (weather update) वर्तवण्यात येत आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.