पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली इच्छा; Muhammad Yunus यांनी फोन करून केली बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेची निश्चिती

200
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली इच्छा; Muhammad Yunus यांनी फोन करून केली बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेची निश्चिती

शेजारील हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावर व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच १६ ऑगस्ट रोजी बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला आणि येथील अल्पसंख्याक हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः यासंदर्भात ट्वीट केले आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “प्राध्यापक मुहम्मद युनूस यांचा दूरध्वनी आला. प्रचलित परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण केली. लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि सुरक्षेचे आश्वासन त्यांनी दिले.”

(हेही वाचा – Dynasty In Politics : धारावीत काँग्रेस घराणेशाही; कार्यकर्त्यांमध्ये चिड)

नुकतेच युनूस यांनी राजधानी ढाका येथील ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली. तेव्हा त्यांनी बांगलादेशातील हिंदूंशी संपर्क साधला होता. माजी पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या हिंसाचारात अल्पसंख्याकांवर हल्ले करणाऱ्यांना शिक्षा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

सर्वांना न्याय दिला जाईल – हिंदूंना केले आश्वस्त

५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना बांगलादेश सोडावा लागल्यानंतर बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंना ५० जिल्ह्यांमध्ये २०० हून अधिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. पोलीस यंत्रणा कोलमडल्याने, हिंदू कुटुंबे, संस्था आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेकांना प्राण गमवावा लागला. बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी मंगळवारी ढाका येथील ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली आणि हिंदू समुदायाच्या नेत्यांना आश्वासन दिले की, “आपण सर्व एकच आहोत” आणि “सर्वांना न्याय दिला जाईल”.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.