एसएसएलव्ही-डी 3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल PM Narendra Modi यांनी इस्रोचे केले अभिनंदन

139
एसएसएलव्ही-डी 3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल PM Narendra Modi यांनी इस्रोचे केले अभिनंदन

नवीन उपग्रह प्रक्षेपक (एसएसएलव्ही)-डी 3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

कमी खर्चात मोहीम करणारे एसएसएलव्ही अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि खासगी उद्योगाला प्रोत्साहन देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा – सर्वांत लहान प्रक्षेपक SSLV-D3 चे प्रायोगिक उड्डाण यशस्वी)

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले :

“एक उल्लेखनीय मैलाचा दगड! आपल्या शास्त्रज्ञांचे आणि उद्योगाचे या कामगिरीबद्दल अभिनंदन. भारताकडे आता नवा प्रक्षेपक आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.कमी खर्चात मोहीम करणारे एसएसएलव्ही अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल आणि खाजगी उद्योगालाही प्रोत्साहन देईल. @isro, @INSPACeIND, @NSIL_India आणि संपूर्ण अंतराळ उद्योगाला शुभेच्छा.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.