कोलकाता बलात्कार प्रकरणी भाजपाच्या Smriti Irani संतापल्या, म्हणाल्या…  

279
कोलकाता बलात्कार प्रकरणी भाजपाच्या Smriti Irani संतापल्या, म्हणाल्या...  
कोलकाता बलात्कार प्रकरणी भाजपाच्या Smriti Irani संतापल्या, म्हणाल्या...  

माजी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी कोलकाता रुग्णालयात (Kolkata Hospital) एका विद्यार्थ्यावर बलात्कार आणि खून करण्याच्या बाबतीत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांच्यावर सडकून टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार (R. G. Car medical college rep case) आणि निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांसह सामान्य जनताही रस्त्यावर उतरली आहे.शातच माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला आहे. (Smriti Irani)

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांचे आदेश; कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर राबवणार योजना)

कोलकाता बलात्कार प्रकरणासंदर्भात स्मृती इराणी यांनी पत्रकार (Smriti Irani press conference) परिषद घेतली. यावेळी त्यांनी ममता सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तिथे अशी व्यक्ती कोण होती जिच्यामुळे बलात्कारानंतर तो घरी परत येऊ शकतो असा विश्वास बलात्कार करणाऱ्याला होता? मुलीने आत्महत्या केल्याचे पालकांना सांगणाऱ्या पोलिसातील ती व्यक्ती कोण आहे, त्या अधिकाऱ्यावर आतापर्यंत काय कारवाई झाली?, असे सवाल स्मृती इराणी यांनी यावेळी उपस्थित केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या संपूर्ण प्रकरणावर राजकारण करत आहेत, असेही स्मृती इराणी यांनी म्हटलं. 

(हेही वाचा – Mahim Dadar Assembly Constituency : शिवसेना भवनाच्या अंगणात शेलारांच्या भेटीगाठी वाढल्या)

“मुख्यमंत्री ममता यांनी ‘माझा बलात्कार-माझा बलात्कार’चे राजकारण थांबवावे. राज्यातील राजकारण पाहून भारतातील जनता मुलीवरील बलात्काराविरुद्ध आवाज उठवणार का? राज्याच्या गृहमंत्री ममता बॅनर्जी आहेत. त्या स्वतःच्या विरोधात आंदोलन करत होत्या? लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणे बंद करा. बलात्कारी बेफिकीर आहेत, पण जमाव येऊन आंदोलकांवर हल्ला करतो. गुंडांची फौज जमते आणि पोलिसांना त्याची माहिती नसते. ते पुराव्याचा भाग असलेल्या गोष्टी नष्ट करतात,” असे स्मृती इराणी म्हणाल्या. (Smriti Irani)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.