Electric Cremation: ‘रे रोड’ येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी तांत्रिकी दुरूस्तीच्या कामासाठी तात्पुरती बंद

74
Electric Cremation: 'रे रोड' येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी तांत्रिकी दुरूस्तीच्या कामासाठी तात्पुरती बंद
Electric Cremation: 'रे रोड' येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी तांत्रिकी दुरूस्तीच्या कामासाठी तात्पुरती बंद

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई विभागातील (E Ward) हिंदू वैकुंठधाम स्मशानभूमीतील (Hindu Vaikunth Dham Crematorium) विद्युतदाहिनीच्या तांत्रिक दुरूस्तीचे आणि परिरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विद्युतदाहिनीची सेवा बंद राहील. विद्युतदाहिनीशी संबंधित कामे पूर्ण झाल्यानंतर ही विद्युतदाहिनी नागरिकांच्या सेवेत पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल. (Electric Cremation)

तथापि, याठिकाणी असणारी पारंपरिक पद्धतीची अंत्यविधी सेवा कार्यरत आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) ‘ई’ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली इच्छा; Muhammad Yunus यांनी फोन करून केली बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेची निश्चिती)

याऐवजी नजीकच्या चंदनवाडी, वरळी येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचा पर्याय या कालावधीत उपलब्ध असेल, असेही ‘ई विभाग’ कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.