Hyundai Palisade : नवीन पिढीची हयुंदे पॅलिसेड गाडी रस्त्यावर धावण्यासाठी तयार?

Hyundai Palisade : आधीच्या पॅलिसेड गाडीत काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत

142
Hyundai Palisade : नवीन पिढीची हयुंदे पॅलिसेड गाडी रस्त्यावर धावण्यासाठी तयार?
Hyundai Palisade : नवीन पिढीची हयुंदे पॅलिसेड गाडी रस्त्यावर धावण्यासाठी तयार?
  • ऋजुता लुकतुके

ह्युंदे कंपनीची (Hyundai Palisade) मोठी एसयुव्ही गाडी असलेली पॅलिसेड मेकओव्हरच्या तयारीत आहे. आधीच्या पिढीतील गाडीत मूलभूत बदल केले जात आहेत. आणि नवीन गाडीचं उत्पादन यावर्षीच्या अखेरीस सुरू होणार आहे. त्यामुळे गाडीचं लाँचिंग मात्र पुढील वर्षीच्या शेवटापर्यंत पुढे गेलं आहे. किया टेल्युरॉईड आणि टोयोटा हायलँडर अशा दोन तगड्या गाड्यांची स्पर्धा असल्यामुळे नवीन गाडीतील बदलही तंत्रज्जान आणि लुकच्या बाबतीतही आधुनिकता आणणारे असतील.

(हेही वाचा- एसएसएलव्ही-डी 3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल PM Narendra Modi यांनी इस्रोचे केले अभिनंदन)

यापूर्वी ह्युंदे कंपनीने (Hyundai Palisade) पॅलिसेड लाँच करण्याची पूर्ण तयारी केली होती. पण, हायब्रीड गाड्यांची वाढती मागणी बघता त्यांनी आता पॅलिसेडला हायब्रीज स्वरुपात आणण्याचं ठरवलं आहे. ह्युंदे कंपनीचं नवीन थेटा इंजिन या गाडीत असेल. आणि ३.० पेट्रोल क्षमतेचं हे इंजिन ३०० बीएचपी इथकी शक्ती निर्माण करू शकेल.

 गाडीचा लुक आणि डिझाईन आधुनिक आणि गाडी ताकदवान असल्याची साक्ष देणारा आहे. गाडीचा आकार टोकदार आहे. तर गाडीच्या आतही नवीन स्टिअरिंग व्हील आणि डॅशबोर्ड देण्यात आला आहे. गाडीच्या आतील डिजिटल स्क्रीनही कर्व्ह्ड असेल. गाडीचं ग्रील आणि हेडलाईट्स बदलण्यात आले आहेत. (Hyundai Palisade)

(हेही वाचा- Uddhav Thackeray यांच्या मागणीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सपशेल दुर्लक्ष; मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नाहीच)

तर अशा या बदलेल्या गाडीची किंमत भारतात ५० लाख रुपयांच्या पुढे असेल असा अंदाज आहे. (Hyundai Palisade)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.