उदयपूर (Udaipur, राजस्थान) येथील भटियानी चौहट्टा सरकारी शाळेत झालेल्या वादातून मुसलमान विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील देवराज नावाच्या हिंदु विद्यार्थ्यावर चाकूने वार केले. यात देवराज गंभीररित्या घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत. दोघेही विद्यार्थी १५ वर्षांचे आहेत. या घटनेनंतर येथे हिंसाचार चालू झाला.
(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या मुंबईतील सभेवर प्रश्नचिन्ह; वाहतूक पोलिसांनी घेतला आक्षेप)
जमावाकडून दुकाने आणि वाहने यांची तोडफोड करण्यात आली, तसेच काही वाहनेही जाळण्यात आली. या वेळी पोलिसांनी हिंसाचार करणार्यांवर लाठीमार केला. हिंदूंकडून येथे बाजार बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी येथे जमावबंदी लागू केली आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थी आणि त्याचे वडील यांना कह्यात घेतले आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला ?, हे अद्याप समजू शकलेले नाही.
या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांचं पथक त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. या घटनेनंतर उदयपूरमध्ये (Udaipur) तणावाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी घटनास्थळी पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
शाळा आणि महाविद्यालये बंद
पुढील आदेशापर्यंत सर्व (खाजगी आणि सरकारी) शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं जारी केले आहेत. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याच्या आदेशात असे म्हटले आहे की, ‘सर्व सरकारी/निमसरकारी शाळांमध्ये इयत्ता 1 ते 12 पर्यंत आणि सर्व सरकारी/निमसरकारी महाविद्यालयांमध्ये 17.08.2024 पासून पुढील आदेशापर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.’ सूचना न पाळणाऱ्या शाळा/महाविद्यालयांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community