वक्फ बोर्ड सुधारणा कायदा मंजूर होऊ देणार नाही, अशी घोषणा करणारे जनाब उद्धव ठाकरे हे केवळ खुर्चीसाठी राजकारण करत असल्याची घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. लोकसभेत फेक नरेटिव्हने मिळवलेली मुस्लिम मते येत्या निवडणुकीत कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाचे समर्थन करत असून त्यांच्या या भूमिकेने स्वर्गीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील, असे ते म्हणाले.
(हेही वाचा – अविवाहित मुलीला सांभाळण्याची जबाबदारी वडिलांची; Allahabad High Court चा निर्वाळा)
बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला प्रचंड वेदना
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात काँग्रेस उबाठांच्या नावाला पाठिंबा देत नाही, मग अशा भूमिकेमुळे काँग्रेस त्यांच्या नावाला पाठिंबा देईल, या स्वार्थी उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी आज भूमिका घेतल्याचे खासदार म्हस्के म्हणाले. उबाठाच्या या भूमिकेने आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला प्रचंड वेदना झाल्या असतील. या करिता हा हिंदुत्ववादी पक्ष उभा केला का हा प्रश्न बाळासाहेबांना स्वर्गात पडला असेल. केवळ खुर्ची करिता आणि खुर्चीच्या राजकारणाकरिता अशा प्रकारची वक्तव्ये ठाकरे करत आहेत, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.
खासदार म्हस्के पुढे म्हणाले की, वक्फ बोर्डाला बरखास्त करायला हवे, जिथे जमीन लाटण्याचे काम सुरु आहे अशा ठिकाणच्या जमिनी ताब्यात घ्यायला पाहिजेत, अशी जाहीर भूमिका हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. परंतु त्यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डाचे समर्थन करुन बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान केला आहे. गोरगरिब मुस्लिम बंधु भगिनींना न्याय मिळवण्यासाठी वक्फ बोर्डामध्ये सुधारणा करण्याचे विधेयक संसदेत आणण्यात आले आहे. परंतु केवळ मुल्ला मौलवींना खूश करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत जे काही मतदान केले आणि आता ते आपल्या विरोधात जाईल, या भीतीने उबाठाने अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. उबाठांच्या बदलत्या भूमिकेकडे लक्ष देऊन त्यांना येत्या निवडणुकीत जागा दाखवावी, असे आवाहन खासदार म्हस्के यांनी मतदारांना केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community