‘त्या’ शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार! 

गुरुवारी, १७ जून रोजी 'त्या'  शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्या शिवसैनिकांचा सत्कार केला. त्यांचे कौतुक केले. 

192

शिवसेना भवन येथे आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांचा गुरुवारी, १७ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भाजप कार्यकर्त्यांसोबत झाली झटपट!

अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी स्थापन ट्रस्टवर जमीन घोटाळ्याचा जो आरोप झाला आहे. त्यावरून शिवसेनेने टीकाटिपण्णी केली. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपकडून फटकार मोर्चाचे आयोजन केले. त्याचे नेतृत्त्व तेजिंदर सिंग यांच्याकडून करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर आंदोलन केले. त्यावेळी भाजपच्या मोर्चाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी शिवसैनिकही सेनाभवनासमोर जमले. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यात राडा झाला. त्यावेळी दोन्ही बाजूने झटापटी झाली. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना गाडीत कोंबून पोलिसांची गाडी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाकडे जात असताना काही शिवसैनिकांनी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला.

New Project 9 5

आंदोलकांची धरपकड करण्यासाठी शिवसैनिक धावले. त्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत हाणामारी केली. त्यामुळे पोलिसांनी शिवसैनिकांनाही ताब्यात घतले. या प्रकरणी माहीम पोलिस ठाण्यात भाजप कार्यकर्त्या अक्षता तेंडुलकर यांनी शिवसैनिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यामध्ये जबरी चोरी, विनयभंग असे गंभीर आरोप लावले. पोलिसांनीही त्याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. गुरुवारी, १७ जून रोजी ‘त्या’  शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्या शिवसैनिकांचा सत्कार केला. त्यांचे कौतुक केले.

(हेही वाचा : भाजपला शिवप्रसाद मिळाला, शिवभोजन देण्याची वेळ आणू नका! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.