Nitesh Rane यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, पोलिसांना जमत नसेल, तर…

264
Nitesh Rane यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, पोलिसांना जमत नसेल, तर...
Nitesh Rane यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, पोलिसांना जमत नसेल, तर...

‘जोपर्यंत यांच्या घरात लव्ह जिहाद होत नाही, तोपर्यंत यांना झळ बसणार नाही’, असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तसंच ‘तुम्हाला बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत आणि आम्ही काही सरकारमधून जात नाही हे लक्षात ठेवा’, असं म्हणत त्यांनी पोलिसांनाही थेट इशारा दिला. दरम्यान, राणे (Nitesh Rane) यांनी ‘उनका अली, हमारा बजरंग बली’ अशी घोषणा देत भाषण केलं. (Nitesh Rane)

उल्हासनगरमध्ये हिंदू मुलीच्या मुस्लिम (Hindu-Muslim Controversy) धर्मांतराविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा शनिवारी काढण्यात आला होता. याच मोर्चात आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. मोर्चापूर्वी त्यांनी धर्मांतर झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेत त्यांची कहाणी ऐकली. याच मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांनी वेळीच सहकार्य न केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी “पोलिसांना मी सांगेन, तुम्हाला जमत नाही तर एक दिवसाची सुट्टी घ्या आणि हिंदूंच्या हातात द्या. नाही, जर ह्या हिरव्या सापांना मारले तर बघा. त्या मुलीच्या घरी ते हिरवे साप आले आणि त्यांनी तिच्या घरातील मंदिर जाळून टाकले. आज हिंदू म्हणून जागृत राहिला नाही तर तुम्ही पूजा देखील करू शकणार नाही” असं नितेश राणे म्हणाले. “आज हिदू संघटित झाले, त्यामुळे पोलिस फोर्स लावावी लागली. तुम्ही तीन चार तास एकत्र आलात तर या पोलिसांची हवा टाईट झाली” असं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : सरकारने घेतला खड्ड्यांचा धसका; खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन)

‘एका घरात चाळीस चाळीस बांग्लादेशी कसे राहतात?’

“तुमच्या उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एकही जिहादी सापडणार नाही. पोलिसांनो तुम्हाला हे बिर्याणी वाले, वाचवायला येणार नाही. तुम्ही बुलडोझर नाही चालवला, तर देवा भाऊचा बुलडोझर चालेल” असं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले. “मिरा रोडमध्ये एकदा बुलडोझर चालला, आता ढुंगण पण वर काढत नाही. पोलिसांनो तुम्हाला एक सांगतो हे जिहादी तुमचे कधी होणार नाहीत. आझाद मैदान येथे रझा अकादमी (Raza Academy) यांनी काय केले ते आठवा. काल नाशिकमध्ये काय झाले. हिरवे वळवळयाला लागले, त्यांना आपल्या हिंदुंनी ताकद दाखवली. दगडफेक त्यांनी केली पण आपल्या लोकांनी जे उत्तर दिले, त्यामुळे आता त्यांना त्यांचा अबू देखील आठवणार नाही. उल्हासनगर मध्ये एका घरात चाळीस चाळीस बांगलादेशी कसे राहतात?” असा सवाल नितेश राणेंनी केला.

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.