उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपासोबत युतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जी खेळी केली, तीच आता महाविकास आघाडीसोबत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
ज्यांच्या जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री
२०१९ ची विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपा युती म्हणून लढले. निवडणूक झाल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्री पदाचे दिलेले आश्वासन पाळले नाही, असा खोटा प्रचार उद्धव ठाकरे यांनी करायला सुरुवात केली तसेच ‘भाजपाने आश्वासन पाळल नाही म्हणून भाजपाशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले’, असे ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. दुसरीकडे, ज्यांच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री, असे निवडणुकीआधी आधी ठरल्याचा दावा भाजपाने केला आहे तर ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, असेही भाजपाने स्पष्ट केले.
(हेही वाचा – Assembly Election 2024 : मुंबईत सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती)
शुक्रवारी १६ ऑगस्टला मुंबईत महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी २०१९ चा भाजपासोबतच्या युतीचा संदर्भ दिला. त्यात ठाकरे म्हणतात, २०१९ ला भाजपानेदेखील ‘ज्या पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल’ असे जाहीर केले आणि दोघांमध्ये एकमेकांचे उमेदवार पाडण्याची स्पर्धा लागली.
ठाकरे नकळत उघडे पडले
हे सांगताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नकळत उघडे पडले. भाजपाने बंद दाराआड अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले नसल्याची जाहीर कबुलीच यातून त्यांनी दिली. यांचा अर्थ जनतेने दिलेला कौल डावलत, सत्तेसाठी भाजपावर विश्वासघात केल्याचा आरोप करत ठाकरे यांनी युती तोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली.
तोच खेळ..
आता हाच डाव ठाकरे महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत खेळत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदासाठी दबाव टाकून निवडणूक लढवायची आणि कमी जागा आल्या तरी मुख्यमंत्री पद आपल्याला मिळावे, यासाठी आग्रह धरायचा, असा खेळ करण्याच्या प्रयत्नात उबाठा आहे का? असा सवाल केला जात आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : सरकारने घेतला खड्ड्यांचा धसका; खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन)
काँग्रेसवर दबाव
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठापेक्षा काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्री पदावर दावा कायम राहील, या उद्देशाने ठाकरे यांनी काँग्रेसवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. भाजपासोबत जो खेळ खेळला तोच आता काँग्रेससोबत खेळण्याचा उबाठाचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community