बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर तिथल्या एका पत्रकाराने काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. गेल्या महिन्यात शरद पवारांनी खालिदा झिया यांच्या मुलाची लंडनमध्ये भेट घेतली होती. भाजपाने ही गंभीर बाब असल्याचे सांगत काँग्रेसला विचारले आहे की, हे खरे आहे का? भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहीन सिन्हा यांनी राहुल गांधी यांच्या लंडनमध्ये खालिदा झिया यांच्या मुलासोबत झालेल्या भेटीचे वृत्त गंभीर असल्याचे सांगत ही बैठक झाली होती का आणि झाली असेल तर त्यांचा अजेंडा काय होता, हे काँग्रेसने तातडीने सांगावे, अशी मागणी केली आहे.
आयएएनएसशी बोलताना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहीन सिन्हा म्हणाले की, बांगलादेशातील एका ज्येष्ठ पत्रकाराने आमचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर मोठा आरोप केला आहे की, राहुल गांधी आणि खलिदा झिया यांच्या मुलामध्ये गेल्या महिन्यात लंडनमध्ये बैठक झाली होती, त्यावेळी राहुल गांधी यांनी बांगलादेशात सुरू असलेल्या आंदोलनाला हिरवा झेंडा दिला होता.
भाजपाच्या प्रवक्त्याने काँग्रेसकडून उत्तर मागताना सांगितले की, राहुल गांधींवर (Rahul Gandhi) लावलेला हा खूप मोठा आणि गंभीर आरोप आहे. यावर काँग्रेसने तात्काळ उत्तर द्यावे की, गेल्या महिन्यात राहुल गांधी 10 दिवस भारतात नव्हते, त्यावेळी ते लंडनमध्ये होते का आणि त्यांनी तिथे खलिदा झिया यांच्या मुलाची भेट घेतली होती का आणि तसे झाले असेल तर त्या बैठकीचा अजेंडा काय होता?
आंदोलनाबाबत मार्गदर्शन करत होते
तुहीन सिन्हा पुढे म्हणाले की, गुरुवारी, 8 ऑगस्ट रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका शिष्टमंडळाची भेट घेतली होती ज्यात अर्थशास्त्रज्ञ जीन ड्रेझ यांचा समावेश होता आणि त्याच जीन ड्रेझला दुसऱ्याच दिवशी 9 ऑगस्ट रोजी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करताना अटक करण्यात आली होती. बांगलादेशातील गृहयुद्धाचा नेहमीच पुरस्कार करणारे नदीम खानही त्यांच्यासोबत येथे उपस्थित होते. त्यामुळे बांगलादेशात हिंदूंच्या जीवाला धोका असताना 8 ऑगस्ट रोजी राहुल गांधी दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनाबाबत दिल्लीतील त्यांच्या घरी या लोकांना मार्गदर्शन करत होते.
देश पेटेल या राहुल गांधींच्या वक्तव्याचा काय अर्थ होता?
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत गंभीर आरोप करत त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी यांच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधींच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणाले की, या वर्षी 31 मार्च रोजी राहुल गांधी म्हणाले होते की, “भाजपा सत्तेवर आल्यास देश पेटेल. आता जे नवे खुलासे समोर येत आहेत, त्यानंतर राहुल गांधींनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा की त्या वक्तव्याचा अर्थ काय होता? बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात यावी अशी राहुल गांधींना खरोखर इच्छा होती का? काँग्रेस पक्षाच्या शहरी नक्षलवादी मानसिकतेचा यापेक्षा मोठा पुरावा असूच शकत नाही.
Join Our WhatsApp Community