Mukhyamantri ladki Bahin Yojana: महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू – फडणवीस

201
Mukhyamantri ladki Bahin Yojana: महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू - फडणवीस
Mukhyamantri ladki Bahin Yojana: महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू - फडणवीस

राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, असेही ते म्हणाले. (Mukhyamantri ladki Bahin Yojana)

उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadanvis) पुढे म्हणाले, आजचा कार्यक्रम हा सावित्रींच्या लेकींचा आहे. पुणे ही समाजकारणाची आणि परिवर्तनाची भूमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri ladki Bahin Yojana) सुरूवात पुण्यापासून केली जात आहे. हे सरकार बहिणींना लाभ देणारे सरकार आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कार्यक्रमापूर्वीच जमा झाले आहेत. ऑगस्टमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल, त्यांना जुलैपासूनच लाभ मिळेल. सप्टेंबरमध्ये ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होईल, त्यांनाही जुलैपासूनच लाभ मिळेल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) आणि सचिव अनुपकुमार यादव (Secretary Anup Kumar Yadav) यांच्या नेतृत्वात अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे. (Mukhyamantri ladki Bahin Yojana)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : मुंबईत सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती)

विकसित भारत करणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) स्वप्न आहे. महिलांचा विकास झाला, तरच भारत विकसित होऊ शकतो असे प्रधानमंत्री कायम म्हणतात. त्यामुळेच केंद्र आणि राज्यात आम्ही स्त्रीकेंद्रित योजना सुरू केल्या. लखपती दिदी, लेक लाडकी, शिक्षण शुल्क माफी योजना आणि लाडकी बहीण योजना या दृष्टीकोनातूनच सुरू करण्यात आल्या गेल्या. राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी, असा आमचा प्रयत्न आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : मुंबईत सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती)

ही योजना म्हणजे आम्ही महिलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. ही रक्षाबंधनानिमित्त (Rakshabandhan 2024) दिलेली ओवाळणी आहे. आईचं आणि बहिणीचं प्रेम जगातील कोणतीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. माझ्या माय माऊलीला पंधराशे रुपयांचे मोल समजते, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Mukhyamantri ladki Bahin Yojana)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.