Mangeshi Temple : काय आहे मंगेश मंदिराचा इतिहास? आणि काय आहे मंदिराचं वेगळेपण?

136
Mangeshi Temple : काय आहे मंगेश मंदिराचा इतिहास? आणि काय आहे मंदिराचं वेगळेपण?

मंगेश मंदिर (Mangeshi Temple) हे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर गोवा राज्यातल्या पोंडा तालुक्यातल्या प्रियोल नावाच्या गावात आहे. हे ठिकाण मंगेशी म्हणूनही ओळखलं जातं. हे मंदिर मर्दोलपासून नागूशी जवळ १ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तर पणजीपासून २१ किलोमीटर आणि मडगावपासून २६ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. मंगेशी हे सारस्वत ब्राह्मण आणि इतर गोत्रांचे कुलदेव आहेत. कवळे मठाचे श्रीमद स्वामीजी हे मंगुशी संस्थानचे अध्यात्मिक प्रमुख आहेत. हे मंदिर गोव्यातल्या सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे.

२०११ साली या मंदिरासोबतच आसपासच्या परिसरातील इतर मंदिराच्या संस्थांनी मंदिरात येणाऱ्या लोकांसाठी ड्रेस कोडची सक्ती केली आहे. धार्मिक स्थळांचं पावित्र्य राखण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.

(हेही वाचा – cordelia cruise ticket price : कॉर्डेलिया क्रूझ – महासागरातून फिरण्याचा घ्या चित्तथरारक अनुभव!)

मंगेशी मंदिराचा इतिहास

मूळ मंगेशी मंदिर (Mangeshi Temple) हे मॉर्मुगाव तालुक्यामधल्या कुशस्थली कोर्तलिम या गावामध्ये होतं. या गावावर १५४३ साली पोर्तुगीजांनी आक्रमण केलं. १५६० साली पोर्तुगीजांनी मॉर्मुगाव तालुक्यात हिंदूंचं ख्रिश्चन धर्मांतर सुरू केलं. त्यावेळी लिंगा आणि सारस्वत गोत्रातल्या ब्राह्मणांनी कौंड येथे स्थलांतर केलं. अघनाशिनी म्हणजेच झुआरी किंवा सँकोले या नदीच्या काठावरीच्या कुशस्थली म्हणजेच कोर्टालिम इथल्या अत्रुंजा तालुक्यातल्या प्रियोल गावातल्या मंगेशी या ठिकाणी त्या मंदिराची पुनर्स्थापना केली.

ब्राह्मणांनी स्थलांतर केल्यानंतर मराठ्यांच्या कारकिर्दीमध्ये या मंदिराची दोनदा पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धार करण्यात आला. शेवटचं नूतनीकरण १९७३ साली झालं तेव्हा घुमटाच्या वर एक सोनेरी कलश बसविण्यात आला. मंदिराची रचना अतिशय साधी होती. सध्याची रचना मराठा राजवटीत बांधली गेलेली आहे. १७३९ साली पेशव्यांनी आपले सरदार श्री रामचंद्र मल्हार सुखटणकर यांच्या सांगण्यावरून मंगेशी हे गाव मंदिराला दान केलं. रामचंद्र मल्हार सुखटणकर हे मंगेशाचे कट्टर अनुयायी होते.

(हेही वाचा – उमेद अभियान बचत गटातील महिला CM Eknath Shinde यांना पाठविणार एक कोटी राख्या)

मंदिराची मुख्य देवता

मुख्य मंदिर हे शिवाचा अवतार असलेले भगवान मंगेश यांना समर्पित आहे. भगवान मंगेश यांची त्या मंदिरात शिवलिंग रुपात पूजा केली जाते. श्री मंगेश हे अनेक गौड सारस्वत ब्राह्मण आणि सारस्वत ब्राह्मणांचे कुलदेवता आहेत.

तसंच या मंदिराच्या संकुलामध्ये नंदिकेश्वर, गजानन, भगवती आणि वत्सगोत्रातील ग्रामपुरुष देव शर्मा या देवतांची मंदिरंही आहेत. मुलकेश्वर, वीरभद्र, संतेरी, लक्ष्मीनारायण, सूर्यनारायण, गरुड आणि कालभैरव या देवतांच्या मंगेशी मंदिराच्या मुख्य इमारतीच्या मागच्या बाजूला देवस्थानं आहेत.

मंगेशी मंदिराचा परिसर

या मंदिराच्या वास्तूमध्ये अनेक घुमट, स्तंभ आहेत. एक प्रमुख नंदी बैल आणि एक सुंदर सात मजली दीपस्तंभ आहे. हा दीपस्तंभ सारस्वत स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात एक भव्य पाण्याचे टाकेही आहे. हा या मंदिराचा फार जुना भाग असल्याचं मानले जाते.

तसंच या मंदिराचं (Mangeshi Temple) सभागृह खूप मोठं आहे. या सभागृहामध्ये एकाच वेळी ५०० पेक्षा जास्त लोक सामावू शकतात. मंदिराच्या सजावटीमध्ये एकोणिसाव्या शतकातल्या झुंबरांचा समावेश आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.