Google Pixel 9 Series : गुगल पिक्सेल ९ सीरिज हा गुगल एआयचा सर्वोत्तम अविष्कार

Google Pixel 9 Series : मेड बाय गुगल कार्यक्रमात गुगलने पिक्सेल ९ सीरिज, वॉच ३ आणि बड्स प्रो २ लाँच केले आहेत.

162
Google Pixel 9 Series : गुगल पिक्सेल ९ सीरिज हा गुगल एआयचा सर्वोत्तम अविष्कार
  • ऋजुता लुकतुके

गुगलची मेड बाय गुगल हा वार्षिक कार्यक्रम यंदा थोडा लवकरच झाला. ४ तास चाललेल्या या कार्यक्रमात गुगलने पिक्सेल ९ सीरिजचे ४ स्मार्टफोन, पिक्सेल वॉच ३ आणि पिक्सेल बड्स प्रो २ ही उपकरणं लाँच केली. स्मार्टफोनची पिक्सेल ९ सीरिज ही लक्षवेधी ठरली. कारण, यंदा गुगलने या सीरिजमधून लोकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेत चार नवीन मॉडेल लाँच केली आहेत. सगळीकडे गुगल एआयचा शिडकाव दिसत आहे. (Google Pixel 9 Series)

पिक्सेल ९

पिक्सेल ९ हे नवीन सीरिजमधील प्राथमिक मॉडेल आहे. ६.३ इंचांचा ॲक्च्युआ डिस्प्ले असलेली आणि १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन या फोनमध्ये आहे. तर प्रखरता २,७०० नीट्स इतकी आहे. कॉर्निंग गोरिला ग्लासचा वापर यात करण्यात आला आहे. धूळ तसंच पाण्यापासून हा फोन सुरक्षित असेल. गुगलचा जी४ चिपसेट या फोनला चालवतो. १२ जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये २५६ जीबीचं स्टोरेज असेल. ५० मेगापिक्सेलच्या कॅमेरात ८ एक्स झूमची सोय आहे.

(हेही वाचा – Mumbai Airport : ज्वलनशील पदार्थ विमानातून घेऊन जाणाऱ्या प्रवाशासह ५ जणांना अटक)

पिक्सेल ९ प्रो

नावाप्रमाणेच प्रो असलेला हा फोन १,०९,००० रुपयांपासून होतो. त्यातून तुम्हाला फिचरची कल्पना येईल. ६.३ इंचांचा स्क्रीन असला तरी तो सुपर ॲक्च्युवा आणि एलटीपीओ तंत्रज्ञानाने बनलेला आहे. फोनमध्ये प्रखरता ३००० नीट्सची आहे. १६ जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये अंतर्गत स्टोरेजच १ टेराबाईटचं असेल. प्राथमिक कॅमेरा ४८ मेगा पिक्सेलचा असेल. तर ५ एक्स ऑप्टिकल झूमही या फोनमध्ये आहे. (Google Pixel 9 Series)

पिक्सेल ९ प्रो एक्सएल

नावाप्रमाणेच या फोनच्या डिस्प्लेचा आकार एक्सएल म्हणजे मोठा आहे. यात ६.८ इंचाचा सुपर ॲक्च्युला डिस्प्ले आहे. तर एलटीपीओ तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात आला आहे. १६ जीबी रॅम आणि १ टेराबाईट स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये बॅटरीही तगडी असेल. फोनमधील कॅमेरा मात्र पिक्सेल ९ प्रमाणेच आहे. या फोनची किंमत १,२४,९९९ रुपये इतकी आहे.

(हेही वाचा – मुलुंडमध्ये BJP ला करावी लागणार खांदेपालट?)

पिक्सेल ९ प्रो फोल्ड

हा गुगलचा पहिला फोल्डेबल फोन आहे. फोनला ६.३ इंचांचा कव्हर डिस्प्ले असेल तर फोन उघडल्यावर सुपर डिस्प्ले ८ इंचांचा होईल. सुपर ॲक्च्युआ एलटीपीओ असलेला हा डिस्प्ले असेल. १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि २७०० नीट्सची प्रखरता या डिस्प्लेमध्ये आहे. गुगलच्याच टेन्सर जी४ या प्रणालीवर आधारित हा फोन असेल. प्राथमिक कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा आणि वाईड लेन्स १०.५ मेगापिक्सेलची असेल. यात मायक्रोफोकसही असेल. सेल्फी कॅमेरा १० मेगापिक्सेलचा असेल. (Google Pixel 9 Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.