IQOO Z9 : आयक्यू ओओ झेड ९ सीरिज भारतात लाँचसाठी सज्ज

IQOO Z9 : आयक्यूओओ फोनचं डिझाईन हे विवोशी मिळतंजुळतं आहे.

138
IQOO Z9 : आयक्यू ओओ झेड ९ सीरिज भारतात लाँचसाठी सज्ज
  • ऋजुता लुकतुके

आयक्यूओओ आणि आयक्यूओक्यू हे दोन्ही फोन भारतात २१ ऑगस्टला लाँच होणार आहेत. आणि सुरुवातीला ॲमेझॉन या ऑनलाईन वेबसाईट आणि ॲपवर ते उपलब्ध होतील. फोनचे सगळे फिचर उघड झाले नसले तरी काही गोष्टी एव्हाना बाहेर आल्या आहेत. आणि त्यानुसार या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ चा तिसऱ्या पिढीतील प्रोसेसर असेल. आधी मीडियाटेक चिपसेट असेल अशा चर्चा सुरू होत्या. आयक्यूओक्यू झेड९ आणि आयक्यूओओ झेड९एस हे दोन्ही फोन कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहेत. त्यातून या फोन मॉडेलविषयी काही माहिती आपल्याला मिळू शकते.

कंपनीने कॅमेराची वैशिष्ट्य हेतुपुरस्सर झाकून ठेवली आहेत. पण, मागच्या बाजूला दोन कॅमेरे असलेलं स्पष्ट दिसतंय. तर कॅमेराच्या शेजारी असलेला एलईडी फ्लॅशही ठळकपणे दिसतोय. कंपनीने फोनचे चार रंग आपल्या वेबसाईटवर दाखवले आहेत. संगमरवरी पांढरा, शेवाळी हिरवा, भगवा आणि लाल रंगातील फोन वेबसाईटवर झळकले आहेत.

(हेही वाचा – Anis : अंनिसचे मूळ नाव ‘मानवीय नास्तिक मंच’; देव, धर्माला न मानणारी संघटना; चेतन राजहंस यांनी केली पोलखोल)

स्नॅपड्रॅगन ७ तिसऱ्या पिढीतील प्रोसेसर या फोनमध्ये आहे. तर तीन फोन पैकी प्राथमिक कॅमेरा हा ५० मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर असलेला असणार आहे. त्याचबरोबर ८ मेगापिक्सेलची अल्ट्रावाईड लेन्सही या फोनमध्ये आहे. कॅमेरासाठी कंपनीने एआय फोटो एन्हान्स आणि एआय फोटो इरेज ही प्रणालीही विकसित केली आहे.

फोनची बॅटरी ५,००० एमएएच क्षमतेची असेल. दोन्ही फोन हे २०,००० रुपयांच्या आतील असून आयक्यूओओ ५जी फोन १९,९९९ रुपयांना मिळेल. तर आयओक्यूओ फोन झेड९ हा फोनही १३,९९९ रुपयांना उपलब्ध होईल. सुरुवातीला ॲमेझॉनवर फोनची विक्री होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.