- ऋजुता लुकतुके
विवो ही चिनी कंपनी असली तरी तिचे फोन हे स्वस्तातले नसतात. आताही विवो व्ही४० सीरिज आली आहे. या फोनची किंमतही ४९,००० रुपयांपासून सुरू होत आहे. मीडियाटेक म्हणजे गेमिंससाठी कंपनीने ही सीरिज आणली आहे. आता व्ही४० ही नावाप्रमाणेच या सीरिजची चौथी पिढी आहे. यात व्ही४० आणि व्ही४० प्रो असे दोन फोन कंपनीने आणले आहेत. या फोनचं प्री बुकिंग देशात सुरू झालं आहे.
आधीच्या सीरिजच्या तुलनेत कंपनीने व्ही४० सीरिजमध्ये बरेच बदल केले आहेत. फोनमध्ये मोठ्या क्षमतेचा स्टिरिओ स्पीकर असेल. तर फोनला आयपी६८ रेटिंगही आहे. कारण, धूळ, माती आणि पाणी यापासून हा फोन सुरक्षित असल्याचं हे रेटिंग आहे. फोनची बॅटरी ५,५०० एमएएच क्षमतेची आहे. तसंच फास्ट चार्जिंगही ८० वॅटचं आहे.
Are you ready to capture Portraits So Pro with the new vivo V40 series? Shop now and get amazing online and offline offers.
Click the link below to buy now.https://t.co/I8kOs3GiMi#vivoV40Series #10Yearsofvivo #ZEISSPortraitSoPro pic.twitter.com/Hw8cZMS5Jw
— vivo India (@Vivo_India) August 13, 2024
(हेही वाचा – केंद्राकडून महाराष्ट्रात एक लाख कोटींची गुंतवणूक; Milind Deora यांचा दावा)
स्नॅपड्रॅगन ७ हा तिसऱ्या पिढीचा प्रोसेसर या फोनमध्ये आहे. फोनचा एमोल्ड डिस्प्ले ६.७ इंचांचा आहे. आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्झचा आहे. फोनमधील तीनही कॅमेरे हे ५० मेगापिक्सेलचे आहेत. प्राथमिक कॅमेराबरोबरच अल्ट्रावाईड लेन्सही यात देण्यात आली आहे. आणि तिसरा कॅमेरा हा सेल्फी किंवा व्हीडिओ कॉलिंगसाठी असेल.
व्ही४० सीरिजची सुरुवात ३४,९९९ रुपयांपासून होते. तर प्लस ५जी मॉडेल ५०,००० रुपयांपासून सुरू होतंय.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community