कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. (Calcutta Doctor Case) या पत्रात डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय कायदा कडक करत ठोस उपाययोजना करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) केली आहे. त्यासोबतच रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्याची मागणी, ज्यामध्ये सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांची व्यवस्था चांगली असण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, डॉक्टरांची शिफ्ट 36 तासांपर्यंत होत असल्याने महिला डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्सना रेस्ट रुम पुरवाव्यात, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.
(हेही वाचा – Shivsena Hearing in SC : शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; विधानसभेच्या तोंडावर राजकीय भूकंप होणार ?)
डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी
इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, 60 टक्के महिला डॉक्टर्स आहेत, 68 टक्के डेंन्टल डॉक्टर्स, 75 टक्के फिजिओथेरपिस्ट आणि 85 टक्के नर्सिंगमध्ये असल्याने आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासह विविध मागण्या लवकरात लवकर मान्य पूर्ण करण्याचं आवहनदेखील इंडियन मेडिकल असोसिएशननं पंतप्रधानांना केलं आहे.
कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. याचे पडसाद शनिवारी देशभरात उमटले. शनिवारी देशभरात डॉक्टरांनी संप पुकारला होता. आरोग्य मंत्रालय डॉक्टरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि निवासी डॉक्टर्स असोसिएशन ऑफ दिल्ली सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी दिल्लीत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हे आश्वासन दिलं आहे. (Calcutta Doctor Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community