Mumbai Local : दंड मागितल्याने टीसीला मारहाण; विरार एसी लोकलमधील घटना

Mumbai Local : जसबीर सिंग यांचा शर्ट फाडत आणि त्यांना प्रचंड प्रमाणात शिवीगाळ करत या तिघांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत जसबीर सिंग यांना दुखापत झाली आहे.

227
Mumbai Local : दंड मागितल्याने टीसीला मारहाण; विरार एसी लोकलमधील घटना
Mumbai Local : दंड मागितल्याने टीसीला मारहाण; विरार एसी लोकलमधील घटना

मुंबई लोकलमध्ये टीसीला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. चर्चगेटहून विरारच्या दिशेने एसी लोकल निघाली होती. या एसी लोकलमध्ये (Mumbai Local) जसबीर सिंग हे टीसी चढले होते. त्यांनी तिकीट तपासण्यास सुरुवात केली. त्या वेळी तीन जण फर्स्ट क्लासचं तिकिट घेऊन एसी लोकलमध्ये (Mumbai Local) चढले. त्यामुळे जसबीर सिंग यांनी या तिघांना दंड ठोठावला.

हे तिघेही टीसी जसबीर सिंग यांच्याशी वाद घालू लागले. नंतर या वादाचं रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झालं. जसबीर सिंग यांचा शर्ट फाडत आणि त्यांना प्रचंड प्रमाणात शिवीगाळ करत या तिघांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत जसबीर सिंग यांना दुखापत झाली आहे. जसबीर सिंग हे मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून काम करतात.

(हेही वाचा – Doctors Strike : डॉक्टरांच्या संपामुळे ससूनमध्ये रुग्णांचे हाल)

फर्स्ट क्लासचे तिकीट घेऊन एसीने प्रवास

चर्चगेटहून विरारच्या (Virar Local) दिशेने निघालेली लोकल बोरिवली स्थानकात पोहचत होती. त्या वेळी जसबीर सिंग हे तिकिट तपासत एक एक डब्यात पुढे जात होते. त्याचवेळी तीन प्रवाशांकडे फर्स्ट क्लासचे तिकिट आहे, एसीचे नाही, हे त्यांना कळले. त्यामुळे त्यांनी या तिघांनाही सांगितलं की तुम्ही तिघांनी दंड भरा आणि पुढचा प्रवास सुरु ठेवा. अशात अनिकेत भोसले नावाच्या एका प्रवाशाने त्यांच्याशी वाद सुरु केला. यानंतर सिंग यांनी या तिघांना बोरिवली स्थानकात उतरा, असे सांगितले मात्र तिघांनीही नकार दिला आणि वाद घालण्यास सुरुवात केली.

यानंतर अनिकेत भोसले, त्यांच्यासह असलेले दोघेजण आणि टीसी जसबीर सिंग यांच्यात हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपी या रेल्वे डब्यात (Mumbai Local) आले. त्यानंतर सिंग यांनी सगळा प्रकार सांगितला. अभिषेक यादव या मुंबईकराने या सगळ्यानंतर काय घडलं तो व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सरकारी नोकरी जाण्याच्या भीतीने माफी

जसबीर सिंग यांनी सांगितलं की, “मी भोसले आणि इतर दोघांना बोरिवली स्थानकात (Mumbai Local) उतरण्यास सांगितलं पण त्यांनी उतरण्यास नकार दिला. या तिघांनी माझा शर्ट फाडला. त्यामुळे इतर प्रवाशांकडून गोळा करण्यात आलेले दंडाचे १५०० रुपये खाली पडले.” असंही जसबीर सिंग यांनी सांगितलं. ही ट्रेन या भांडणामुळे बोरिवली स्थानकातच थांबवण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी आरोपी भोसले आणि इतर दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली. मात्र सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने भोसले यांनी चूक मान्य करत लेखी माफी मागितली. (Mumbai Local)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.