Kolkata येथील घटनेनंतर गृहमंत्रालय सतर्क; घेतला ‘हा’ निर्णय

150
Kolkata येथील घटनेनंतर गृहमंत्रालय सतर्क; घेतला 'हा' निर्णय
Kolkata येथील घटनेनंतर गृहमंत्रालय सतर्क; घेतला 'हा' निर्णय

कोलकातामध्ये (Kolkata) एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या आणि खूनाच्या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील सर्व पोलिस दलांना निर्देश जारी केले आहेत.

(हेही वाचा – Road Accident : राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट; धोका मात्र कायम)

कायदा आणि सुव्यवस्थेचा रिपोर्ट द्यावा लागणार

केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) दिलेल्या निर्देशांनुसार, आता पोलिसांना दर २ तासांनी आपल्या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा एक रिपोर्ट गृह मंत्रालयाला पाठवाला लागणार आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना हे बंधनकारक असेल.

कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले आहे. या आदेशामध्ये सततच्या अपडेट्सवर भर देण्यात आलेला असून सर्व पोलिस दलांना ई-मेल, फॅक्स किंवा व्हॉट्सअपद्वारे मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला माहिती पुरवावी लागेल.

कोलकाता येथील संताप आणणाऱ्या घटनेनंतर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने असे आदेश काढले आहेत. (Kolkata)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.