ST च्या ताफ्यात येणार २४७५ नव्या बस

182
ST च्या ताफ्यात येणार २४७५ नव्या बस
ST च्या ताफ्यात येणार २४७५ नव्या बस

महाराष्ट्राची लाल परी असलेली आणि गेल्या वर्षभरापासून महिलांमध्ये प्रसिद्ध ठरणारी एसटी तिच्या ताफ्यात अधिक बस दाखल करणार आहे. एसटी (ST) महामंडळाच्या ताफ्यात आता ‘टू बाय टू’च्या (Two by two) गडद लाल रंगाच्या दोन हजार ४७५ नव्या एसटी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी ३०० बस पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी दाखल होणार आहेत.

(हेही वाचा – राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखण्याचे CM Eknath Shinde यांचे आवाहन)

पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरच्या शेवटी ३०० नव्या बसचा ताफा एसटी महामंडळात दाखल होईल. एका बसची किंमत ३८ लाख २६ हजार रुपये आहे. अशोक लेलँडने स्वत: या बसची बांधणी केली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात नव्या बससाठी एक हजार १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. एसटी महामंडळाने अशोक लेलँड कंपनीसोबत नव्या बससाठी करार केला होता.

गाड्या एसटीच्या वर्कशॉपमध्ये बांधल्या असत्या तर…

नव्या एसटी बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत याचा आनंदच आहे.एक वर्षापूर्वी याचे टेंडर पास झाले होते. स्वतःच्या मालकीच्या गाड्या येत आहेत याचा जास्त आनंद आहे. मात्र, या गाड्या एसटीच्या वर्कशॉपमध्ये बांधल्या असत्या वर्कशॉपला हे काम मिळाले असते, तर पैसे वाचले असते, अशी भावना महाराष्ट्र एस.टी. (ST) कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.