Mumbai – Nashik Highway वर वाहतूक कोंडी; नियम तोडणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईची गरज

Mumbai - Nashik Highway वर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे नाशिक-मुंबई दरम्यानचा १५० किलोमीटरचा चार ते साडेचार तासांचा प्रवास सध्या सात ते आठ तासांवर गेला आहे.

134

मुंबई – नाशिक महामार्गावरील (Mumbai – Nashik Highway) वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. आधीच या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यात भर पडली ती अवजड वाहनांची. हे वाहनचालक अजिबात लेनची शिस्त पाळत नाहीत. या महामार्गावरून जाताना विशेषतः भिवंडी येथून जात असताना अवजड मालाची वाहतूक करणारे वाहनचालक सर्रास वाहतुकीचे नियम मोडतात, म्हणून महामार्गावर केवळ बोर्ड लावून उपयोगाचे नाही, तर त्याबरोबरच वाहनचालकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

traffic

(हेही वाचा दहशतवादासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र या; ग्लोबल साउथ देशांना PM Modi यांचे आवाहन)

चार ते साडेचार तासांचा प्रवास सात ते आठ तासांवर गेला

या महामार्गावर (Mumbai – Nashik Highway) पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे नाशिक-मुंबई दरम्यानचा १५० किलोमीटरचा चार ते साडेचार तासांचा प्रवास सध्या सात ते आठ तासांवर गेला आहे. महामार्गाचा भिवंडी वळण रस्त्यापर्यंतचा भाग राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या तीन यंत्रणांकडे विभागून असल्याने त्रांगडे निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील रस्ता अजूनही अर्धवट आहे. ठाणे जिल्ह्यात महामार्गालगतच्या (Mumbai – Nashik Highway) गोदामांमुळे अहोरात्र अवजड वाहनांची महामार्गाने ये-जा सुरू असते. त्यामुळे कोंडीत भर पडून वाहनधारक दोन-तीन तास अडकून पडतात. या अवजड वाहनांचे चालक त्यांच्यासाठी राखीव असलेली लेन तोडून बिनधास्त  हलक्या वाहनांच्या लेनमध्ये घुसतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

(हेही वाचा सहानुभूतीतून मिळालेली लोकप्रियता फार काळ टिकत नाही; रत्नाकर महाजनांचा Uddhav Thackeray यांना टोला)

भिवंडी परिसरातील गोदामांतून देश पातळीवर कंटेनर, अवजड वाहनांद्वारे मालाची वाहतूक केली जाते. या वाहनांसाठी वेळेची मर्यादा ठेवण्यात यावी, अशी सूचना करण्यात येत आहे. दुपारी आणि रात्री काही तास निश्चित करून त्या वेळेतच अवजड वाहनांनी महामार्गावर (Mumbai – Nashik Highway)  प्रवेश करावा, यापूर्वी अवजड वाहनांसाठी दुपारी १२ ते चार आणि रात्री १२ नंतर वाहतुकीला मुभा दिली गेली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.