World Photography Day चे काय आहे महत्व?

१९ ऑगस्ट, १८३९ रोजी, फ्रान्समधील लुई डॅग्युरे आणि जोसेफ निसेफोर निपसे यांनी 'Daguerreotype' नावाच्या पहिल्या यशस्वी छायाचित्रण प्रक्रियेचा शोध लावला.

170
World Photography Day चे काय आहे महत्व?
World Photography Day चे काय आहे महत्व?

World Photography Day (जागतिक छायाचित्रण दिन) दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. Photography ही एक प्रकारची कला आहे. फोटोग्राफीच्या माध्यमातून माणसांपासून प्राण्यांपर्यंतच्या भावना न बोलता व्यक्त करता येतात.

१९ ऑगस्ट, १८३९ रोजी, फ्रान्समधील लुई डॅग्युरे आणि जोसेफ निसेफोर निपसे यांनी ‘Daguerreotype’ नावाच्या पहिल्या यशस्वी छायाचित्रण प्रक्रियेचा शोध लावला. या दिवसाचे महत्व जाणून घेण्यासाठी जागतिक छायाचित्रण दिन (World Photography Day) साजरा केला जातो. आजच्या युगात छायाचित्रकार छायाचित्रे टिपण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करतात. आता तर कोणताही क्षण सहज टिपता यावा, यासाठी प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे.

(हेही वाचा – आमदार Dilip Lande यांच्यातर्फे श्रावण महिन्यात भव्य कावड यात्रेचे आयोजन)

पण १८३९ मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियस नावाच्या व्यक्तीने फिलाडेल्फियामधील आपल्या वडिलांच्या दुकानाचा फोटो घेण्यासाठी कॅमेरा लावला आणि नंतर तो फोटो क्लिक केला. त्यानंतर, फोटो काढल्यानंतर सुमारे ३ मिनिटांनी पोर्ट्रेट फोटो बाहेर आला. आज इतका वेळ लागला तर आपल्यला वैताग येईल. पण कोणत्याही आधुनिकीकरणाची सुरुवात अशीच होते.

कोणताही दिवस साजरा करण्यासाठी एक थीम आयोजित केली जाते. २०२३ मध्ये या दिवसाची थीम ‘लँडस्केप्स’ ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे २०२४ सालासाठी जागतिक छायाचित्रण दिनाची (World Photography Day) थीम ‘संपूर्ण दिवस’ अशी ठेवण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस कॅमेरात कैद करु शकता. मात्र करत असताना कलात्मकता हवी.

फोटोग्राफी ही उत्तम कला आहे. फोटो काढणार्‍याला जितका आनंद मिळतो, तितका आनंद फोटो पाहणार्‍यालाही मिळतो. त्यामुळे इतर कलांसोबत या कलेलाही मान, प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=BQ3ON3XKNXk&t=1s 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.