गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात नोकरीतील आरक्षणावरुन मोठा गोंधळ सुरू आहे, शेख हसीन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशही सोडला असून आता तिथे पुन्हा एकदा गोंधळ सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. बांगलादेशातील हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. बांगलादेशातील गोंधळावरुन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. भिडे गुरुजी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सवाल केला आहे.
(हेही वाचा Mumbai – Nashik Highway वर वाहतूक कोंडी; नियम तोडणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईची गरज)
बांगलादेशात सुरु असल्याच्या निषेधार्थ २५ ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात बंद पाळण्यात येणार आहे. बांगलादेशातील गोंधळावर भारताने पाऊल उचलावीत आणि हा राडा थांबवावा. २० ऑगस्ट रोजी जिल्ह्याधिकाऱ्यांना याबाबत निवेदने देण्यात येणार आहे, अशी माहिती पू. संभाजी भिडे यांनी दिली. बांगलादेशातील सुरू असलेल्या अत्याचाराबाबत एकही राज्यकर्ते बोलत नाही हे वाईट आहे, या विषयावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही बोलावे, ते या विषयावर बोलत नाहीत, असे पू. भिडे गुरुजी म्हणाले. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. आरक्षण कशाला पाहिजे तुम्ही सिंह आहात, देश चालवा आपले जंगल चालवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचा जीवन गाडा हाकत आहेत. महाराष्ट्रात दररोज नवनवीन समस्यांची पालवी फुटत असते. त्यावर रामबाण उपाय करण्याचे काम शासन चांगले पार पाडत आहेत, असेही पू. संभाजी भिडे म्हणाले.
Join Our WhatsApp Community