साताऱ्यात CM Eknath Shinde यांची फटकेबाजी; १७ ऑगस्टला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन’ साजरा करणार

181
साताऱ्यात CM Eknath Shinde यांची फटकेबाजी; १७ ऑगस्टला 'मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन' साजरा करणार
साताऱ्यात CM Eknath Shinde यांची फटकेबाजी; १७ ऑगस्टला 'मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन' साजरा करणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) वचनपुर्ती सोहळा रविवारी (१८ ऑगस्ट) साताऱ्यामध्ये पार पडला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ ऑगस्टला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन’ (Ladki Bahin Din) साजरा करणार असे म्हणत विरोधी पक्षांवर जोरदार फटकेबाजी केली. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Mumbai – Nashik Highway वर वाहतूक कोंडी; नियम तोडणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईची गरज)

काय म्हणाले एकनाथ शिंदे?  

या योजनेचे नाव बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी, या योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे. १७ ऑगस्टला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिन म्हणून साजरा करूयात, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना यशस्वी केल्याबद्दल महिलांचे आभार व्यक्त केले. स्वागत करता येत नसेल तर विरोध तरी करू नका, असे म्हणत आपल्या विरोधकांना साताऱ्यातील फेमस कंदीपेढे (Satara, Kandhi Pedhe) नक्की पाठवा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या योजनेच्या विरोधकांना आमच्या बहिणी त्यांची जागा योग्यवेळी नक्की दाखवतील, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Mukhyamantri ladki Bahin Yojana: पुढच्या अर्थसंकल्पातही युती सरकार लाडक्या बहिणींसाठी तरतूद करणार – फडणवीस)

आम्हाला फक्त ३००० घेऊन थांबायचं नाही… 

“विरोधक दोन चार महिन्यांतून सरकार पडेल म्हणायचे पण अस झालं नाही. मी सामान्य कुटुंबातून आलेला मुख्यमंत्री आहे, सोन्याचा चमचा घेऊन आलेला नाही. आम्ही आता १५०० रुपयांनी योजना सुरू केली पुढे सरकारची ताकद वाढली की या दीड हजाराचे ३ हजार किंवा त्यापेक्षा जास्त होईल. आम्हाला फक्त ३००० घेऊन थांबायचं नाही, आम्हाला लखपती झालेली बहीण बघायची आहे,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.