महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chatrapati Sabhaji Nagar) माध्यान्ह भोजनाची (Mid-day meal) बिस्किटे खाल्ल्याने १८१ शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. यातील नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही बिस्किटे (Poison Biscuits) खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या, तर अनेक विद्यार्थ्यांना अचानक ताप आला. (Mid-day meal Poisoning)
या नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी संभाजी नगर येथे हलवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दोन रुग्णवाहिकेच्या साह्याने संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून आणखी काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे.
(हेही वाचा – Kolkata doctor rape case प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली दखल)
जेवण खाल्ल्यानंतर ताप येऊ लागला
ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. शनिवार असल्याने शाळेतील मुलांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. ही बिस्किटे खाल्ल्यानंतर विद्यार्थिनींची प्रकृती ढासळू लागली आणि त्यांना अचानक ताप आला.
रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना संभाजी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था करून त्यांना संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. अशा स्थितीत या संदर्भात कोणत्या प्रकारची चौकशी सुरू आहे, हे कळत नाही.
(हेही वाचा – लोकसभेचा वचपा विधानसभेत काढणार; खासदार Vishal Patil हे एकनाथ शिंदे गटाला देणार पाठिंबा)
याच महिन्यात पालघरमध्ये
शालेय विद्यार्थ्यांसह ७० हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. पालघरच्या डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मध्यवर्ती स्वयंपाकघरातून शाळेला अन्न पुरवठा करण्यात आला. आश्रमशाळेतील मुलांनी रात्री जेवण केले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना उलट्या आणि जुलाबाची तक्रार सुरू झाली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. (Mid-day meal Poisoning)
हेही पाहा –
https://youtu.be/YBgXfOW4W4Q?si=N-iNhRTFy1yUcGt2
Join Our WhatsApp Community