बायको मुलानंतर आता गायब पतीचाही मृतदेह सापडला! पुणे शहरात खळबळ

शुक्रवारी आदिबचाही मृतदेह सापडल्याने या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे.

123

पुण्यात आई आणि मुलाची हत्या झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर फरार मृत महिलेचा पती आदिब शेख हा फरार झाला होता. पण आता आदिब शेखचा देखील मृतदेह सापडल्यामुळे, पुणे शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. आई आणि मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांचा संशय पती आदिब शेख वर होता, मात्र खानापूर येथील नदी पात्रात त्याचा मृतदेह सापडला आहे.

सापडले तिघांचे मृतदेह

8 वर्षांच्या मुलाला घेऊन पिकनिकसाठी निघालेल्या तरुण आई आणि वडिलांपैकी आधी आईचा मृतदेह सापडला. तिच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर तिच्या मुलाचा देखील अशाच पद्धतीने खून करण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणात पोलिसांना पतीवर संशय होता. पण, आता तीन दिवस उलटल्यानतंर संशयित आरोपी पती आबिद शेख याचाही मृतदेह खानापूर येथे नदी पात्रात सापडला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.

(हेही वाचाः पुणे हादरले! माय-लेकाची हत्या, पती बेपत्ता!)

गूढ वाढले

पुण्याजवळील सासवडमध्ये मंगळवार (15 जून) रोजी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर काही वेळातच तिच्या आठ वर्षांच्या मुलाचाही खून झाल्याचे समोर आले होते. या महिलेचे नाव आलीया शेख असून, तिच्या मुलाचे नाव अयान शेख असे होते. हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहत असून, तीन दिवसांपूर्वी आबिद शेख यांनी ब्रेझा कार पिकनिकला जाण्यासाठी भाड्याने घेतली होती. हे कुटंब पिकनिकसाठी बाहेर तर पडले, मात्र मंगळवारी सकाळी सासवड गावात आलीया हिचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला होता. पुणे शहर, ग्रामीण पोलिस आणि क्राइम ब्रांच युनिट या हत्येचा तपास करत, बेपत्ता असलेल्या आदिबचा शोध घेत होते. मात्र शुक्रवारी आदिबचाही मृतदेह सापडल्याने या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे.

(हेही वाचाः जेव्हा ‘बाप’ होतो ‘सैतान’, तेव्हा…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.