शरद पवारांनी मला मुख्यमंत्री व्हायला सांगितले आहे असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकीकडे मला सांगत होते आणि दुसरीकडे शरद पवारांनी मला सांगितले की तो सर्वस्वी तुमच्या पक्षाचा निर्णय होता. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, तर मी माहौल तयार केला असता. मात्र त्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या ज्या मला नंतर समजल्या. अशा गोष्टी राजकारणात लपून राहात नाहीतअशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्दाफाश केला. ANI ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.
(हेही वाचा लोकसभेचा वचपा विधानसभेत काढणार; खासदार Vishal Patil हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देणार पाठिंबा)
मुख्यमंत्री होण्यासाठी युती तोडली
भाजपाने त्यांना कुठलेही आश्वासन दिले नव्हते. भाजपाकडून उद्धव ठाकरेंना कुठलेही आश्वासन मिळाले नव्हते. भाजपाच्या वरिष्ठांनी मला सांगितले की मित्र पक्षाला जर मुख्यमंत्रीपद द्यायचे ठरले असते तर अडीच वर्षांची अडचण नव्हती. मित्र पक्षाचे कमी आमदार निवडून येऊनही इतर राज्यांमध्ये असा प्रयोग आपण केला आहे. ज्या दिवशी विधानसभेचे निकाल आले तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत. उद्धव ठाकरेंना हे समजले होते की मुख्यमंत्री व्हायचे असेल तर भाजपाशी युती ठेवून चालणार नाही. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचा पर्याय आणला असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community