नाशिकहून मुंबईच्या दिशेन येणाऱ्या एका कंटेनरला भीषण अपघात झाला असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंटजवळ कंटेनरला अपघात (Kasara Ghat Accident) झाला आहे. पाच मृतांपैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तीन बाहेर काढलेल्या मृतांमध्ये दोन तरुणांसह एका चिमुकल्याचाही मृत्यू झाला आहे.
(हेही वाचा Uddhav Thackeray हे शरद पवारांनी सांगितले म्हणून मुख्यमंत्री झाले का? मुख्यमंत्री शिंदेंनी केला पर्दाफाश)
कसारा घाटात अपघात (Kasara Ghat Accident) झाल्यानंतर तात्काळ पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. यावेळी ९ वर्षांच्या चिमुकल्यासह २१ वर्षीय आणि ३० वर्षीय अशा दोन तरुणांचा मृत्यदेह बाहेर काढण्यात आला आहे. नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंटजवळ हा अपघात झाला. कसारा घाटात उतार असल्याने कंटेनर रस्त्यावर आल्यानंतर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर बाजूच्या खोल दरीत कोसळला. यात कंटेनरमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात विजय घुगे (६०,), आरती जायभावे (३१), सार्थक वाघ (२०), चालक योगेश आढाव (५०) आणि रामदास दराडे (५०) यांचा मृत्यू झाला. अक्षय घुगे ((३०), श्लोक जायभावे (पाच वर्ष), अनिकेत वाघ (२१) या जखमींना रुग्णवाहिकेने कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. दरीत टँकरचे सर्व भाग विखुरले गेले असून त्याची ओळख पटणेही अवघड झाले आहे. अपघातात मृत व जखमी सिन्नर तालुक्यातील नेरळ आणि संगमनेर तालुक्यातील निमोण येथील आहेत. चालक कोपरगावचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. (Kasara Ghat Accident)
Join Our WhatsApp Community